यवतमाळ: राज्यातील खान्देश आणि विदर्भातील काही भागांमध्ये आकाशात खगोलीय घटना पहायला मिळाली. मोठ्या प्रमाणावर उल्कापाताच्या घटना रात्रीच्या आकाशात दिसून आल्या. यामुळं नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता पहायला मिळाली तर काहींमध्ये भीतीचं वातावरणंही होतं. (Astronomical events Meteor showers in Khandesh Vidarbha Curiosity in public)
जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये शनिवारी रात्री 8 वाजताच्या दरम्यान अचानक अग्नीबाण व आगीचे गोळे नागरिकांच्या दृष्टीस पडले. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. हा प्रकार नेमका काय आहे, याची सर्वत्र चौकशी सुरू झाली. खगोलशास्त्र अभ्यासकांना या संदर्भात माहिती विचारली असता त्यांनी ही घटना उल्कावर्षाव असल्याचे सांगितले.
जिल्ह्यातील दारव्हा तालुका, आणि पिंपरी खुर्द गावामध्ये मोठ्या प्रमाणात हि दृश्ये लोकांच्या निदर्शन आली व जय सोनोने, स्वराज डाके यांनी हि दृश्ये कॅमेरात टिपली आहे. मात्र अश्याप्रकारे उल्का वर्षाव पाहून लोकांच्या मनात भीती व उत्सुकता निर्माण झाली आहे.