best cattle breed in India: हि गाय देते 50 ते 55 लिटर दूध, फक्त इथे मिळेल या प्रजातीची गाय - Amhi Kastkar
Agriculture News in Marathi

best cattle breed in India: हि गाय देते 50 ते 55 लिटर दूध, फक्त इथे मिळेल या प्रजातीची गाय

2
5/5 - (1 vote)

ह्या जातीची गाय दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. या गाईची दूध देण्याची क्षमता बघून तुम्हीही थक्क व्हाल. तुम्ही पण करत आहात का शेतीसोबतच पशुपालन व्यवसाय तर आजची ही माहिती तुमच्यासाठी खूप उपयोगाची आहे.

भारतातील व महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी परंपरागत शेतीनुसार शेतकरी शेतीसोबतच पशुपालन हा व्यवसाय करतात .शेतीला जोड धंदा म्हणून पशुपालन हा व्यवसाय खूप महत्त्वाचा आहे .शेतीतून निघणाऱ्या कडबा, कुटार ,गवत यावर जगून पशु आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनासाठी तसेच शेतीसाठी खूप फायद्याचे आहेत.

त्यामुळे पशुपालन हा व्यवसाय शेतीला खूप फायद्याचा ठरतो .आणि पूरक व्यवसाय आहे. अशातच पशूपालन व्यवसायामध्ये महत्त्वाचं म्हणजे गाय. त्यातही चांगल्या जातीची गाय असली तर कमी चाऱ्यावर अधिक दूध मिळवणे शक्य होते. म्हणूनच शेतकरी गाईला आपली माय मानतात .त्यातही शेतकऱ्यांना चांगल्या जातीच्या गाई विषयी माहिती असायला हवी .अशाच सर्वात जास्त दूध देणाऱ्या आपल्या महाराष्ट्रातील आपल्या भारतातील गाईच्या काही जाती या लेखामध्ये तुम्हाला मिळणार आहे .काही जातींची दूध देण्याची क्षमता बघून तुम्हीही थक्क व्हाल चला बघूया.

ही गाय देऊ शकते 50 ते 55 लिटरपर्यंत दूध

उत्तर अमेरिकन ,देसी हरियाणा आणि साहिवाल जातीच्या हरधेनु या जातीची गाय 50 ते 55 लिटरपर्यंत दूध देऊ शकते. ही गाय उत्तर अमेरिका व हरियाणामधील सहीवाला या गायीच्या रक्तांच्या मिश्रणापासून तयार करण्यात आलेली आहे. हरियाणा प्रदेशातील हरधेनू गाईची जात अतिशय योग्य मानली जाते या गाईच्या पालनाने पशूपालन व्यवसायामध्ये खूप चांगला नफा मिळू शकतो.

कारण ही एक लोकप्रिय तसेच अधिक दूध देणारी आणि चांगला नफा मिळवून देणारी गाईची जात आहे. स्थानिक जात म्हणजेच गावरान जात ही पाच ते सहा लिटर सरासरी दूध देऊ शकते. पण या गाईच्या तुलनेत हरधेनु गाय दररोज 15 ते 16 लिटर दूध देऊ शकते. ही गाय एका दिवसात 40 ते 50 किलोचा हिरवा चारा किंवा सुखा चारा खाते.

हे पण वाचा –

Share via
Copy link