शेतकरी मित्रांनो, e-KYC पूर्ण केल्याशिवाय मिळणार नाही PM Kisan चा 11 वा हप्ता; अशी करा KYC प्रक्रिया.. - Amhi Kastkar

शेतकरी मित्रांनो, e-KYC पूर्ण केल्याशिवाय मिळणार नाही PM Kisan चा 11 वा हप्ता; अशी करा KYC प्रक्रिया..

5/5 - (3 votes)

How to complete e-KYC in PM Kisan Yojana : : पीएम किसान निधी योजनेच्या 10व्या हप्त्याची वाट पाहत असलेल्या 12 कोटींहून अधिक लाभार्थी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही अजून ई-केवायसी केले नसेल तर १५ डिसेंबरपर्यंत लगेच करा. अन्यथा तुमचा 10 वा हप्ता अडकेल. मोदी सरकारने ई-केवायसी अनिवार्य केले आहे.

सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांसाठी आधार ई-केवायसी अनिवार्य केले आहे. त्याशिवाय शेतकऱ्यांना त्यांचा 10 वा हप्ता मिळणार नाही. पोर्टलवर असे सांगण्यात आले आहे की आधार आधारित ओटीपी प्रमाणीकरणासाठी शेतकऱ्यांना किसान कॉर्नरमधील ई-केवायसी पर्यायावर क्लिक करावे लागेल. बायोमेट्रिक प्रमाणीकरणासाठी जवळच्या CSC केंद्राला भेट द्यावी लागेल. हे काम तुमच्या मोबाईल, कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवरूनही घरी बसून करता येते.

पीएम किसानसाठी ई-केवायसी कसे करावे (How to complete e-KYC in PM Kisan Yojana)

यासाठी प्रथम https://pmkisan.gov.in/ पोर्टल वर जा.

उजव्या कोपर्‍यात सर्वात वर eKYC लिहिले आहे त्यावर क्लिक करा.

How to do Aadhar e-KYC of PM Kisan

आता आधार नंबर आणि इमेज कोड टाकून सर्च बटनवर क्लिक करा.

नंतर आधारसोबत लिंक मोबाईल नंबर टाका आणि ओटीपी टाका.

सर्व ठिक असेल तर eKYC पूर्ण होईल अन्यथा Invalid लिहून येईल.

जर प्रक्रिया इनव्हॅलिड झाली तर आधार सेवा केंद्रावर जाऊन हे ठिक करा. (PM Kisan)

वाचा – ठिबक सिंचन साठी सरसकट ८०% सबसिडी नवीन GR आला, मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना

या शेतकऱ्यांना मिळणार नाही हप्ता

1) जर तुमच्या कुटुंबात कुणीही टॅक्सपेयर असेल.
2) शेतीच्या जमीनीचा व्यावसायिक किंवा इतर वापर.
3) शेतीचे स्वता मालक नसणे.
4) नावावर शेती नसणे.
5) शेती आजोबा, वडीलांच्या नावावर असणे.
6) जमीनीचा मालक आहे, पण सरकार कर्मचारी आहे किंवा निवृत्त झाला असे.
7) विद्यमान आणि माजी खासदार, आमदार, मंत्री.
8) प्रोफेशनल रजिस्टर्ड डॉक्टर, इंजिनियर, वकील, चार्टर्ड अकाऊंटंट किंवा त्यांच्या कुटुंबातील लोक.
9) शेतीचा मालक आहे, पण 10000 रुपयांपेक्षा जास्त महिना पेन्शन मिळत असेल.

धन्यवाद!

How to do Aadhar e-KYC of PM Kisan

5 thoughts on “शेतकरी मित्रांनो, e-KYC पूर्ण केल्याशिवाय मिळणार नाही PM Kisan चा 11 वा हप्ता; अशी करा KYC प्रक्रिया..”

Leave a Comment

Share via
Copy link