How to make silage? | Agrowon


पिकातील पाण्याचं प्रमाण ६० ते ७० टक्के आहे हे कसं ओळखायचं? फार अवघड नाहीय, चाऱ्याची कुट्टी केल्यानंतर ती कुट्टी दोन हातांमध्ये पकडून दाबल्यास पाणी अलगद बाहेर येते मात्र कुट्टीचा गोळा तसाच राहिल्यास, चाऱ्यातील पाण्याचं प्रमाण ७५ ते ८० टक्क्यापेक्षा जास्त आहे असं समजावं. पाणी कमी प्रमाणात किंवा पाणी येतचं नसल्यास पाणी ७० टक्के आहे असं समजावं. पाणी बाहेर येत नाही आणि गोळा हळूहळू मोकळा होत असेल तर पाण्याचं प्रमाण मुरघास (silage)  बनविण्यासाठी उत्तम म्हणजे ६० ते ७० % आहे असं समजून मुरघास बनवू शकता. पाण्याचं प्रमाण ६० % पेक्षा कमी असल्यास गोळा पटकन मोकळा होतो.

– चाऱ्यात पाण्याचं प्रमाण जास्त असल्यास चाऱ्याची कापणी करून तो ३ ते ४ तास वाळवावा. मात्र कुट्टी केल्यानंतर कुट्टी जास्त वेळ बाहेर राहता कामा नये, मुळात पाण्याचं प्रमाण कमी करण्यासाठी कुट्टी कधी वाळवू नये.

– एक गोष्ट लक्षात ठेवा, चाऱ्याची कुट्टी केल्यानंतर ती ताबडतोड खड्यात, पिशवीत किंवा बांधकामात भरली पाहिजे. पहिला २ फुटाचा थर टाकून तो तुडवला पाहिजे.

– असं केल्यानं पहिल्या थरातील काही हवा निघून जाईल. मात्र काही हवा राहील. पण जेव्हा आपण दुसरा २ फुटांचा कुट्टीचा थर टाकून दाबू ना, तेव्हा पहिला थर पूर्णपणे हवाबंद होईल.

– नेहमी लक्षात ठेवा पहिला थर हा १.५ ते २ फुटांचा असला पाहिजे, यापेक्षा जास्त जाडीचा असल्यास त्यातील हवा काढणे अडचणीचे ठरू शकते.

– सुरुवातीला १ फुटापर्यंत कुट्टी टाकल्यानंतर समान पसरवून घ्या. कुट्टी तुडवत असताना एका व्यक्तीने मध्ये तुडवावे आणि दुसऱ्या व्यक्तीने पिशवीच्या किंवा खड्याच्या बाजूने तुडवावे. नंतर दोन्ही व्यक्तींनी बाजूंनी तुडवायला सुरुवात करावी.

– कुट्टी पिशवीत किंवा खड्यात टाकत असताना एकसोबतच तुडवणे आणि कुट्टी टाकण असं करू नका. कुट्टीवर दाब देत असताना ती एकसमान पसरवून मगच दाब द्यायला सुरुवात करावी. कुट्टीचा एक थर (layer)  पूर्ण दिल्यानंतर तुडवायला सुरुवात करावी.

– पहिल्यादांच मुरघास बनवत असाल तर बाजारात उपलब्ध असलेल्या culture चा वापर करावा. कुट्टी दाबताना कुट्टी दबायची बंद झाली की culture टाकून दुसरा थर टाकावा. असे एकावर एक थर टाकून टाकून झाल्यानतर ते हवाबंद (airtight) राहील याची खात्री करून घ्या. या सर्व गोष्टीचं काटेकोरपणे पालन करून  मुरघास केल्यास तो नक्कीच  चांगल्या प्रतीचा होईल. 

हेही पाहा-

 

 

मुरघासची वैशिष्ट्ये –

४५ दिवस ते २ महिने हवाबंद ठेवून तयार झालेल्या मुरघासला चमकदार, हिरवट-पिवळा किंवा सोनेरी-तपकिरी रंग आलेला असतो. मुरघासला आंबट-गोड वास येत असतो म्हणजेच तो आम्लधर्मी आहे… जर मुरघासाचा रंग काळसर व बुरशीयुक्त असेल, तर तो खराब झाला असे समजावं. तसेच, खराब मुरघासात पाण्याचे प्रमाण जास्त असते आणि त्याला घाण वास येतो.

हेही पाहा-

 

मुरघास उघडल्यानंतर तो ५० ते ६० दिवसांत संपला पाहिजे. मुरघास उघडल्यानंतर रोज दिड ते २ फुटांचा थर संपला पाहिजे. मुरघास काढल्यानंतर तो व्यवस्थित हवाबंद करूनही ठेवला पाहिजे. १० ते १२ लिटर दूध (milk) देणाऱ्या गायीला (cow) १५ किलो मुरघास आणि इतर जनावरांना ८ ते १० किलो मुरघास द्यावा. उत्तम प्रतीचा मुरघास जनावरे आवडीने खातात. मुरघास जनावरांना पचविण्यासाठीही सोपा जातो. मुरघास खाऊ घातल्यामुळे जनावरांच्या पोटातील उपयुक्त जिवाणूंचे प्रमाण वाढून पचनक्रिया (digestion) चांगली होते. त्यामुळे जनावरे आजारी पडण्याचे प्रमाण कमी होऊन, दूध उत्पादनामध्येही वाढ होते. मुरघास वापरामुळे चाऱ्याच्या खर्चामध्येही मोठी बचत होते. प्रत्येक गायीचे सरासरी अर्धा ते एक लिटर दूध उत्पादन (milk production) वाढते.

 

 

 

 

 

 

 

 Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment