[ad_1]
चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत इन्सेक्टीसाईड इंडीया लिमिटेड (Insecticides India Ltd) या किटकनाशक कंपनीच्या नफ्यात ३६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. डिसेंबर २०२१ मध्ये संपलेल्या तिमाहीत कंपनीच्या ३१४.६४ कोटींच्या महसुलावर (Revenue) ८.१५ कोटींचा निव्वळ नफा (Net Profit) झाला आहे. मागील वर्षी याच कालावधित झालेल्या ३००.०२ कोटींच्या महसुलावर ५.९९ कोटींचा नफा मिळाला होता.
हेही वाचा – जागतिक पीक उत्पादनात ५३ टक्क्यांची वाढ
मागील वर्षीच्या तुलनेत चालू आर्थिक वर्षात डिसेंबर २०२१ अखेर ८४.६२ कोटींच्या निव्वळ नफ्यासह कंपनीने १८ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. मागील वर्षी याच कालावधित कंपनीचा निव्वळ नफा ७१.४७ कोटी इतका होता. तर आर्थिक वर्षातील नऊ महिन्यांत कंपनीचा महसूल ४.९ टक्क्यांनी वाढून १२२८.१६ कोटी झाला आहे. तर मागील वर्षी याच कालावधित कंपनीचा महसूल ११७०.२१ कोटी रुपये इतका होता.
हेही वाचा – कृषी अभियांत्रिकीसाठी स्वतंत्र संचालनालय स्थापन करा
कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश अग्रवाल (Rajesh Agrawal) यांनी म्हटले आहे की, कोरोनाची लाट आणि निविष्ठांच्या खर्चात वाढ होऊनही कंपनीने तिसऱ्या तिमाहीत वार्षिक विक्री आणि नफ्यात स्थिर वाढ केली आहे. “चालू आर्थिक वर्षातील नऊ महिन्यात आमच्या निर्यातीने १०० कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे हे सांगताना आम्हाला आनंद होत आहे. मागील तिमाही प्रमाणेच आम्ही शेवटच्या तिमाहीत चांगल्या कामगिरीची अपेक्षा करतो”.
[ad_2]
Source link
आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.