चला तर जाणून घेऊया ई-पॅन कार्ड डाऊनलोड (e-Pan Card Download) करण्याची संपूर्ण प्रक्रिया. (Instant e-PAN from new I-T website Step by step guide)
मुंबई : सध्याच्या काळात पॅनकार्ड हे फार महत्त्वाचे कागदपत्र मानले जाते. आजकाल कोणतीही कामं करण्यासाठी पॅनकार्ड अनिवार्य असते. बँकेत खाते उघडणे, क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड घेणे, ITR दाखल करण्यासह इत्यादी ठिकाणी पॅनकार्ड आवश्यक असते. पण चुकून कधीतरी कुठेतरी तुमचे पॅनकार्ड हरवले किंवा तुम्ही ते विसरलात तर तुम्हाला काळजी करण्याची गरज भासत नाही, तर काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही ई-पॅन कार्ड (e-Pan Card) इन्कम टॅक्सच्या नवीन वेबसाईटवरुन सहज डाऊनलोड करु शकता. चला तर जाणून घेऊया ई-पॅन कार्ड डाऊनलोड (e-Pan Card Download) करण्याची संपूर्ण प्रक्रिया. (Lost your PAN card Here how to get instant e-PAN from new I-T website Step by step guide)
पॅन नंबरसह ई-पॅन कसे डाउनलोड कराल?
1. सर्वप्रथम आयकर वेबसाईट https://www.incometax.gov.in/iec/foportal वर लॉगिन करा.
2. त्यानंतर ‘Instant E PAN’ वर क्लिक करा.
3. यात ‘New E PAN’ वर क्लिक करा.
4. त्यात तुम्ही तुमचा पॅन नंबर लिहा.
5. जर तुम्हाला तुमचा पॅन नंबर लक्षात नसेल तर त्याऐवजी तुमचा आधारकार्ड नंबरही टाकू शकता
6. यात अनेक अटी आणि शर्थी दिल्या आहेत. त्या काळजीपूर्वक वाचा आणि मग ‘Accept’ वर क्लिक करा.
7. त्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर ओटीपी पाठवला जाईल. तो त्यात नोंदवा.
8. यानतंर दिलेला तपशील वाचून Confirm वर क्लिक करा.
10. त्यानंतर आता तुमचा पॅन पीडीएफ स्वरूपात तुमच्या ईमेल आयडीवर पाठविला जाईल.
11. यानंतर तुम्ही तुमचा ‘e-Pan’ डाउनलोड करू शकता.
पॅन-आधार लिंक असणे अनिवार्य
तसेच, जर तुम्हाला तुमचा पॅन क्रमांक आठवत नसेल किंवा तुम्ही गोंधळात पडलात तर तुम्ही तुमच्या आधार कार्डाच्या मदतीने ई-पॅन कार्ड डाउनलोड करू शकता. पण यासाठी तुमचे पॅनकार्ड आणि आधार कार्डची लिंक असणे बंधनकारक आहे. जर आपला पॅन आणि आधार जोडलेला नसेल तर आपण ई-पॅन डाऊनलोड करु शकत नाही. (Lost your PAN card Here how to get instant e-PAN from new I-T website Step by step guide)
- Meilleur gratuit Lignes de chat pour des rencontres en 2021
- Petrol Diesel Price Today: पेट्रोल-डिझेल “इतके रुपये” स्वस्त! तात्काळ आपल्या गाडीची टाकी फुल करा
- Petrol Diesel Price Today: पेट्रोल-डिझेल “इतके रुपये” स्वस्त! तात्काळ आपल्या गाडीची टाकी फुल करा
- PMAY 22-23 | घरकुल योजनेचे 1 लाख रुपये अनुदान असे होणार वितरित
- Shetakari KarjMafi Maharashtra | मराठवाडा विदर्भातील या शेतकऱ्यांची होणार कर्जमाफी