[ad_1]
चालू हंगामात भारताची साखर निर्यात (Sugar export) १५ टक्क्यांनी वाढू शकते, अशा अंदाज इंडियन शुगर मिल्स असोसिएशन म्हणजेच इस्माने (ISMA) वर्तवला आहे. गेल्या वर्षीच्या ६० लाख टनांच्या तुलनेत यंदा साखर निर्यात वाढून ७५ लाख टनांपर्यंत जाऊ शकते, असेही इस्माने म्हटले आहे.
हेही वाचा –
addy-area-continues-gain-telangana-rabi-51818″>तेलंगणातील शेतकऱ्यांचा भात पिकाकडे ओढा कायम
यावर्षी जगात साखरेचा १९३ लाख टनांचा तुटवडा भासण्याची शक्यता इंटरनॅशनल शुगर ऑर्गनायझेशनने (आयएसओ) (ISO) आपल्या अहवालात व्यक्त केली आहे. त्यामुळे भारतीय साखरेला मागणी राहण्याची शक्यता आहे. मागील वर्षाच्या ६० लाख टन साखर निर्यातीच्या तुलनेत आत्तापर्यंत ४२ लाख टन साखरेची निर्यात झाल्याची माहिती इस्माने दिली आहे.
हेही वाचा – कर्नाटक सरकार शेतकऱ्यांना डिझेलसाठी देणार अनुदान
इस्माने आपल्या यापूर्वीच्या अंदाजानुसार भारतातून ६० लाख साखर निर्यात होईल, असे म्हटले होते. मात्र, सुधारित अंदाजनुसार, यावर्षी देशातून ७५ लाख टन साखर निर्यात होईल, असे म्हटले आहे. ब्राझिलनंतर भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा साखर उत्पादक देश आहे. मार्च महिन्यात निर्यातदारांकडून आणखी १२ -१३ लाख टन साखर निर्यात होण्याची शक्यता आहे. असेही इस्माने म्हटले आहे.
साखर उत्पादनाच्या (Sugar Production) ताज्या आकडेवारीनुसार, चालू हंगामात फेब्रुवारी महिन्यापर्यंत साखर उत्पादन २५२.८ लाख टनांवर पोहोचले आहे. गेल्या वर्षीच्या या कालावधीतील २३४.८ लाख टनांच्या तुलनेत साखर उत्पादनात यंदा ७.६८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. साखर उत्पादनात महाराष्ट्राशी स्पर्धा करणाऱ्या उत्तर प्रदेशात ऑक्टोबर ते फेब्रुवारीदरम्यान ६८.६ लाख टन साखर उत्पादीत झाली आहे. मागील वर्षी याच कालावधित उत्तर प्रदेशात ७४.२ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते.
यूपीच्या तुलनेत यंदा साखर उत्पादनात महाराष्ट्राने आघाडी घेतली असून फेब्रुवारीपर्यंत राज्यात ९७.१ लाख टन साखर उत्पादित झाली आहे. मागील वर्षी याच कालावधित ८४.८ लाख टन साखर उत्पादन झाले होते. तर तिसऱ्या सर्वाधिक साखर उत्पादन असणाऱ्या कर्नाटकमध्ये यंदा उत्पादनात वाढ झाली आहे. कर्नाटकात मागील वर्षीच्या ४०.८ लाखांवरून साखर उत्पादन ५०.८ लाख टन झाले आहे. याशिवाय गुजरातमध्ये ७.९३ लाख आणि तामिळनाडूमध्ये ४.५३ लाख टन साखर उत्पादन झाले आहे. उर्वरित राज्यांनी या कालावधीत एकत्रितपणे २३. ७ दशलक्ष टन उत्पादन केल्याचे इस्माने सांगितले आहे.
यंदा महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये मोठ्या प्रमाणात ऊस उपलब्ध आहे. परिणामी, महाराष्ट्र आणि कर्नाटकातील उत्पादन अंदाज या वर्षासाठी सुधारित करण्यात आला आहे.तर उत्तर प्रदेशसह इतर राज्यांमध्ये फारसा बदल अपेक्षित नसल्याचे इस्माने म्हटले आहे.
[ad_2]
Source link
आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.