[ad_1]
कृषी व्यवसाय क्षेत्रातील व्यावसायिक घटक म्हणून कंपनी सध्या ई-चौपालच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांशी संबंधित आहे. केंद्र सरकारच्या शेतकरी उत्पादक कंपन्यांना (FPO) प्रोत्साहन देण्याच्या धोरणानुसार कंपनीशी जोडल्या गेलेल्या शेतकऱ्यांमधून येत्या ५ वर्षांत ५ हजार शेतकरी उत्पादक कंपन्या (FPO) स्थापन करण्यात येणार असल्याचे आयटीसीच्या (ITC) कृषी विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रजनीकांत राय यांनी म्हटले आहे. बिझनेस लाईनने या संदर्भातील वृत्त दिले आहे.
हेही वाचा – प्रथिनेयुक्त आहारासाठी खाद्य क्षेत्रातून सोयामीलची मागणी वाढली
कंपनीकडे आजमितीस ९ राज्यांत मिळून ६८०० इ-चौपाल आहेत. यातील बऱ्याच शेतकरी समूहांनी त्यांची स्वतःची शेतकरी उत्पादक कंपनी (FPO) सुरु केली आहे. कृषीमालाच्या बाजारपेठांशी जोडल्या जाणे ही आजची देशभरातील शेतकरी उत्पादक संघटनांसमोरची सर्वांत महत्तम गरज आहे. आयटीसीने शेतकऱ्यांसाठी एक ॲप विकसित केले असून या ॲपचा प्रायोगिक वापर सध्या सुरु आहे. या प्रायोगिक वापरानंतर कंपनी येत्या काळात देशभरातील कंपनीशी जोडल्या गेलेल्या शेतकऱ्यांना जागतिक बाजाराशी जोडण्याचे काम केले जाईल. त्यांच्या सक्षमीकरणासाठी आवश्यक तांत्रिक मार्गदर्शनही कंपनीतर्फे करण्यात येणार आहे.
हेही वाचा – अर्थसंकल्पातील कृषीच्या तरतुदी योग्य दिशेने; शेतकरी नेत अनिल घनवट यांची प्रतिक्रिया
दुग्ध व्यवसाय, फलोत्पादन, सागरी उत्पादनांसह कंपनी २२ प्रकारच्या कृषी उत्पादन व्यवहारात सक्रिय असून या क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या शेतकरी उत्पादक कंपन्या (FPO) सुरु करण्यावर भर दिला जाणार आहे. या कंपन्या स्वतःच्या बळावर कार्यरत होतील, आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम होतील, यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. या कंपन्यांना प्रक्रिया उद्योग क्षेत्रात चालना देण्यासोबतच त्यांना संघटितरीत्या अधिक मोठ्या कृषी माल बाजारपेठेशी जोडण्याचा प्रयत्न असल्याचेही राय म्हणाले आहेत.
आज देशाच्या बाजार समित्यांत शुल्क आकारणीबाबत एकवाक्यता नाही. एकाच उत्पादनासाठी विविध राज्यांतील बाजार समित्यांत आकारल्या जाणाऱ्या शुल्कात मोठी तफावत आहे. त्यामुळे येत्या काळात शेतकरी स्वतःच्या बचत गट अथवा शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून आपल्या शेतीमालाची थेट विक्री करायला लागले तरी या क्षेत्रातील व्यावसायिक कंपन्यांनाही व्यवसायासाठी पारंपारिक बाजारावर अवलंबून राहण्याची गरज उरणार नसल्याचेही त्यांनी नमूद केलं आहे.
[ad_2]
Source link