सहज सोपी आणि कमी कष्टाची जिरेनियमची शेती! वर्षाला कमवा सहा ते सात लाख रुपये! - Amhi Kastkar
Agriculture News in Marathi

सहज सोपी आणि कमी कष्टाची जिरेनियमची शेती! वर्षाला कमवा सहा ते सात लाख रुपये!

0
Rate this post

सोडा आता वार्षिक उत्पन्नाची आणि हमीभावाची चिंता ! जिरेनियम शेती मधून कमवा वर्षाला लाखांचे उत्पन्न !
सहज सोपी आणि कमी कष्टाची जिरेनियमची शेती

   नमस्कार,शेतकरी मित्रांनो आज आपण एक अशी शेती  बघणार आहो जी शेतकऱ्यांसाठी फायदेशिर ठरेल, जिरेनियम शेती याविषयी थोडक्यात माहिती पहाणार आहोत. 

जिरेनियम ची लागवड का करायची.?

  • कमीत कमी खर्चा मध्ये जास्तीत जास्त उत्पादन.
  • कोणत्याही हंगामात लागवड करता येते.
  • कमीत कमी खतांचा व औषधांचा खर्च.
  • कमीत कमी पाण्यावर उत्पन्न घेता येते.
  • -कोणत्याही जमिनीमध्ये उत्तम प्रकारे पीक येते.
  • -कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव होत नाही त्यामुळे औषधांचा खर्च नाही.या वनस्पतीला कोणतीही जनावरे खात नसल्यामुळे त्यांच्या पासून नुकसान नाही.
  • या पिकावर प्रक्रिया करावयाचे असल्यामुळे चोरीला जाण्याचे ही टेन्शन नाही.
  • -पारंपारिक पिकांमुळे जमिनीचा कस कमी झालेला आहे तो आपण या पिकामुळे परत एकदा वाढवू शकतो.
  • -या औषधी वनस्पती पासून तयार केलेल्या तेलास भारतामध्ये व विविध देशांमध्ये सुद्धा प्रचंड मागणी आहे.
  • एकरी फक्त एक लाख रुपये भांडवलामध्ये तीन ते पाच वर्ष आपण उत्पन्नच घेऊ शकतो.
  • इतर सर्व बागायती पिकांपेक्षा या पिकांमध्ये हमखास उत्पन्न मिळण्याची खात्री आहे म्हणूनच जिरेनियम शेती इथून पुढील काळात फायद्याची ठरेल.

आज अनेकांनी जिरेनियम ची लागवड केलेली आहे. आणि जेरेनियम मधून लाखो चे उत्पन्नही कमावलेले आहे अशा अशा अनेक प्रगत शेतकऱ्यांची यशोगाथा आपण यूट्यूब चैनल वर पाहू शकता त्या मधून नही तुम्हाला भरपूर काही माहिती मिळू शकते त्याच बरोबर तुम्ही कंपनीशी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करूनही जिरेनियम ची शेती करू शकता जिरेनियम शेती विषयी अधिक माहितीसाठी तुम्ही जवळच्या तुमच्या तालुक्यातील तुमच्या जिल्ह्यातील कृषी विभागाशी संपर्क साधू शकता जिरेनियम शेती ही एक औषधी वनस्पती ची शेती आहे त्यामुळे जिरेनियम ची रोपे सबसिडी मध्ये शेतकऱ्याला उपलब्ध होतात आणि सरकारही या शेतीला आता प्रोत्साहन देत आहे त्यामुळे जेरेनियम शेतीतून कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळवता येते.

जिरेनियम एक सुगंधी व औषधी वनस्पती आहे याची अधिक माहिती ही सरकारच्या सुगंधी औषधी विभागांमध्ये मिळते .या वनस्पतीची लागवड केल्यास किमान तीन वर्ष या वनस्पतीपासून आपल्याला उत्पादन मिळते. एका एकर मध्ये दहा हजार रोपे आपण लावू शकतो . आणि हे पीक एका वर्षात तीन वेळा कापणीला येते. या पिकांमध्ये आपण आंतरपीक सुद्धा घेऊ शकतो .शेवगा हे आंतरपीक एकदम उत्तम आहे .शेवग्याच्या उत्पन्नावरच लागवडीचा संपूर्ण खर्च निघून जातो .आणि फक्त नफा जिरेनियम शेती मधून आपल्याला मिळतो. या पिकापासून ओईल निर्मिती केली जाते .एक लिटर ची किंमत 1250 रुपये मिळते. याच्या ऑइल पासून परफ्युम सेंटेड वस्तू बनवल्या जातात . त्यामुळे , भारतात तसेच परदेशातही जिरेनियम तेलाची मोठ्या प्रमाणात मागणी आहे म्हणून जेरेनियम शेती ही शेतकऱ्यांसाठी एक मोठी संधी घेऊन येत आहे.

Share via
Copy link