कापसाप्रमाणेच सोयाबीनचे भावही वाढू शकतात ,शेतकऱ्यांनी घ्यावे असे निर्णय ! - Amhi Kastkar
Agriculture News in Marathi

कापसाप्रमाणेच सोयाबीनचे भावही वाढू शकतात ,शेतकऱ्यांनी घ्यावे असे निर्णय !

0
Rate this post

शेतकऱ्याच्या काही महत्त्वाच्या पावलामुळे यावर्षी कापसाचे भाव वधारले आहे . भाव ठरविण्याचे अधिकार प्रथमच शेतकऱ्यांनी आपल्या हाती घेतले आहे . कापसाच्या भावांमधील अर्थकारण शेतकऱ्यांना आता कळले आहे.(bajar samiti maharashtra)

या वर्षी कापूस आणि सोयाबीनचे उत्पादन का घटले ? (APMC rate soyabean, cotton)

कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना यावर्षी नैसर्गिक आपत्तींचा फटका बसलेला आहे . खरीप हंगामात होत असलेल्या सतत धार पावसामुळे व अतिवृष्टीमुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सोयाबीन उत्पादनामध्ये फटका बसला त्यानंतर लांबलेल्या पावसामुळे कापसाला सुद्धा फटका बसला या दोन्ही पिकांची एकूण सरासरी 30 ते 40 टक्‍क्‍यांनी घसरले असा कृषी खात्याचा अहवाल आहे . कापसाची आणि सोयाबीनची आवक यामुळे बाजारपेठेमध्ये कमी झाली. (Soyabean prize maharashtra)

कापसाला हमी भावाच्या दीडपट भाव(kapus hami bhav)

कापसाचे भाव यावर्षी हमीभावाच्या दीडपट वाढलेले आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना होतच आहे. सद्यस्थितीत 9 हजार 500 ते 9 हजार 700 रुपयांपर्यंत भाव आहे. कापसाला उतारा बघून भाव दिल्या जाते.
एका क्विंटल मध्ये 35 ते 36 किलो रुईचा उतारा येतो. तर 62 ते 63 किलो सरकी निघते. रुई व सरकी चे प्रमाण प्रतिक्विंटल मध्ये 35 ते 65 असे असायला पाहिजे .खरेदीदार हे प्रमाण बघून भाव निश्चित करीत असतात. (Today kapus bajar bhav)

यावर्षी कापसाचा भावाने का गाठला उच्चांक? (Kapus bajar bhav update)

शेतकऱ्याने यावर्षी फुंकून फुंकून पावले टाकलेली आहे .कापसाचे अर्थकारण समजल्याने भाव ठरविण्याचे अधिकार शेतकर्‍यांनी सर्वप्रथम आपल्या हाती घेतलेले आहे. त्याचे परिणाम खुल्या बाजारातील आवकवर होत आहे. यावर्षी शेतकऱ्याने कापसाची आवक रोखली. त्यामुळे बाजारातील आवक मंदावली व खरेदीदारांना भाव चढे ठेवणे भाग पडले .अमरावती जिल्ह्यातील सर्व जिनिंग-प्रेसिंग मधली कापसाची आवक अल्प आहे .शेतकरी सहकारी जिनिंग प्रोसेसिंग मध्ये तर रोज सरासरी 700 ते 800 क्विंटल कापसाची आवक होते . मागच्या वर्षी हेच प्रमाण तिप्पट-चौपट होते अशी माहिती तज्ज्ञांकडून मिळाली आहे. कमी शब्दात सांगायचे म्हटलं तर, शेतकऱ्यांनी यावर्षी कापसाची आवक रोखून धरल्यामुळे कापसाचे भाव वधारले आहे. (Kapus bajar bhav news)

सोयाबीनचे भाव कसे अधिक वाढतील? (Soya bajar bhav)

कापूस आणि सोयाबीन उत्पादक(soyabin bhav)शेतकऱ्यांनी आपला माल साठा करण्याची क्षमता वाढली आहे. कापसाची आवक ज्याप्रमाणे शेतकऱ्यांनी रोखून धरली .त्याचप्रमाणे जर सोयाबीनची ही आवक शेतकऱ्याने रोखून धरली आणि सोयाबीन टप्प्याटप्प्याने विकले .तर सोयाबीनचे ही भाव मोठ्या प्रमाणात वाढू शकते .त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य ती पावले उचलावीत. सोयाबीनचे भाव(soyabean rate)आताच सहा ते सात हजार रुपयांवर खेळू लागले आहेत. बाजारामध्ये सोयाबीनचा पुरवठा जर असाच अल्प प्रमाणात होत राहिला. तर येणाऱ्या काही दिवसातच सोयाबीनचे भावही कापसा प्रमाणेच उच्चांक गाठेल हे मात्र नक्की !आता भाव ठरवणे आहे शेतकऱ्यांच्या हातात! (Soyabean prize increases) (kapas rate)

Share via
Copy link