Karjmafi Maharashtra | आता या कर्जदारांना मिळणार शासनाचा दिलासा
नमस्कार मित्रांनो,मित्रांनो शासनाच्या माध्यमातून 27 ऑगस्ट 2021 रोजी एक शासन निर्णय घेऊन मिशन वात्सल्य ही योजना सुरू करण्यात आलेली होती. या योजनेच्या अंतर्गत कोरोणामुळे मृत्यू झालेले जेकाही नागरिक असतील. या नागरिकांच्या पत्नीला विधवा पत्नीला त्यांच्या मुलांना भविष्यामध्ये त्यांच्यासाठी काही योजना राबवण्यासाठी किंवा त्यांना दिलासा देण्यासाठी बरेच सारे उपक्रम राबवण्यासाठी ची घोषणा करण्यात आलेली होती. या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली होती. तत्कालीन सरकारच्या माध्यमातून महिला विकास बालकल्याण विभागाच्या माध्यमातून या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी पाठपुरावा केला जात होता.
हे पण वाचा : Shetakari KarjMafi Maharashtra | मराठवाडा विदर्भातील या शेतकऱ्यांची होणार कर्जमाफी
महिलांना रेशन कार्ड नसतील किंवा त्यांच्यासाठी जे जे आवश्यक अशा बाबी असतील त्यांना निवृत्तीवेतन योजना असेल अशा प्रकारच्या बाबी घरी पोहोचलेत गावांमध्ये मिळाव्यात यासाठी या भीषण वात्सल्य या अभियानाच्या अंतर्गत काम केलं जात होतं. याचाच एक भाग म्हणून आता राज्य शासनाच्या माध्यमातून आणखीन एक मोठं पाऊल उचलण्यात आलेले आहे.
ज्याच्या मध्ये कोरूना कालावधीमध्ये मृत्यू झालेले जे नागरिक आहेत. अशा नागरिकांच्या नावावर ती असलेली कर्ज याच्यामध्ये गृहकर्ज असतील याच्यामध्ये त्यांच्या प्रॉपर्टीवर वरती घेतलेली कर्जा असतील पर्सनल कर्ज असतील किंवा शेतीची पिक कर्ज असतील अशी कर्ज थकीत झालेली आहेत.
हे पण वाचा : Ativrushti Nuksan Bharpai 2022 | राज्यातील १० जिल्ह्याना अतिवृष्टी नुकसान भरपाई जाहीर ! पहा तुमचा जिल्हा आहे का
आता या थकीत झालेल्या कर्जामुळे बँकेच्या माध्यमातून वसुलीसाठी किंवा त्यांच्या जप्तीसाठी वगैरे नोटिसा काढल्या जातात किंवा तशा प्रकारचा तगादा लावला जातो. परंतु आधीच या ठिकाणी कोरोनामुळे आपल्या घरातील कर्ता व्यक्ती गमावलेल्या या कुटुंबावर ते अशा प्रकारचा अन्याय होऊ नये यासाठी शासनाच्या माध्यमातून आता काही दिलासा देण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवरती 11 नोव्हेंबर 2022 रोजी यांच्या संदर्भातील सहकार आयुक्त यांचे पत्र या ठिकाणी पाहू शकता.