शेतकरी कर्जमाफीचा शेवटचा टप्पा लवकरच; कृषिमंत्री दादा भुसे

पुणे : शेतकरी कर्जमाफीची शेवटची प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार असून, नियमित कर्जफेड करणाऱ्यांना देखील प्रोत्साहनपर रक्कम देण्यात येईल. तर कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना नवीन कर्ज देखील मंजूर होणार आहे, असे आश्वासन राज्याचे कृषिमंत्री दादासाहेब भुसे यांनी दिले, असे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रमेश कोंडे यांनी सांगितले.

कृषिमंत्री भुसे यांची जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, खडकवासला मतदार संघ प्रमुख नितीन वाघ, युवा सेना जिल्हा अधिकारी सचिन पासलकर, सुनील पायगुडे यांच्यासह भेट घेतली. हवेली तालुक्यातील शेतकऱ्यांना मागील वर्षी अतिवृष्टीमुळे व चालू वर्षी गारपिटीमुळे झालेल्या नुकसान भरपाईचे अद्याप वाटप झालेले नाही. या संदर्भात देखील चर्चा केली.

हवेली तालुक्यातील खडकवासला मतदार संघातील अनेक शेतकऱ्यांची अद्याप कर्जमाफी जाहीर झालेली नाही. त्याची रक्कम बँकेत अद्याप झालेली नाही. त्यामुळे त्यांचे नवीन कर्ज मंजूर झालेले नाही. यावर मंत्री महोदयांनी सांगितले की उर्वरित शेतकऱ्यांची कर्जमाफी प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल व त्यांना नवीन कर्ज मंजूर होतील. तसेच कृषी विभागाच्या शेतकऱ्यांसाठी अनुदान योजनेचे प्रस्ताव जमा करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करीत आहोत, अशी माहिती कोंडे यांनी यावेळी
दिली.

Leave a Comment

X