Kharif Season: खरीप आला ना…! या हंगामात या भाजीपाला पिकाची लागवड बनवेल शेतकऱ्यांना लखपती, कमी दिवसातच शेतकरी लाखों कमवतील - Amhi Kastkar
Agriculture News in Marathi

Kharif Season: खरीप आला ना…! या हंगामात या भाजीपाला पिकाची लागवड बनवेल शेतकऱ्यांना लखपती, कमी दिवसातच शेतकरी लाखों कमवतील

0
Rate this post

[ad_1]

Kharif Season: देशात आता सर्वत्र मान्सूनने (Monsoon) दस्तक दिली आहे. राज्यात देखील सर्वत्र मोसमी पाऊस झाला असून शेतकरी बांधव (Farmer) आता खरीप हंगामातील पिकांच्या पेरणीसाठी लगबग करत असल्याचे पहावयास मिळत आहे.

खरीप हंगामात जर शेतकरी बांधवांनी पारंपारिक पिकांसमवेतच भाजीपाला वर्गीय पिकांची लागवड (Vegetable Farming) केली तर निश्चितच शेतकरी बांधवांना अतिरिक्त उत्पन्न (Farmers Income) मिळू शकते. काही असे भाजीपाला वर्गीय पिके आहेत जे अल्प कालावधीत चांगले उत्पन्न शेतकरी बांधवांना कमवून देऊ शकतात.

अशा परिस्थितीत आज आपण पावसाळी हंगामात (Rainy Season) उत्पादित केल्या जाणाऱ्या भाजीपाला वर्गीय पिकांची माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया या विषयी सविस्तर.

खरं पाहता, पावसाळी हंगामात भाजीपाला वर्गीय पिकांची शेती (Farming) केली तर या पिकांना सिंचनाची खूपच कमी गरज भासते. पावसाच्या पाण्यावरच भाजीपालावर्गीय पिके उत्पादनासाठी तयार होत असतात. यामुळे पावसाळी हंगामात भाजीपाला वर्गीय पिके लावल्यास उत्पादन खर्चात बचत होते.

पावसाळी हंगामात लावता येणारी पिके

काकडी आणि मुळा

मित्रांनो पावसाळ्यात काकडी व मुळ्याची लागवड करून शेतकरी चांगला नफा मिळवू शकतात. या दोन्ही पिकांना वाढण्यासाठी भरपूर सूर्यप्रकाश आणि पाणी लागते. हे दोन्ही पिके कमी जमिनीत जास्त उत्पादन देतात. दोन्ही भाजीपाला वर्गीय पिके अवघ्या तीन ते चार आठवड्यांत उत्पादनासाठी तयार होतात. यामुळे शेतकऱ्यांना चांगला नफा मिळतो. निश्चितच अल्पकालावधीत शेतकरी बांधवांना या दोन्ही पिकातून चांगला बक्कळ पैसा मिळू शकतो.

कारले

कारल्याच्या सेवनाने अनेक आजारांपासून दूर राहते.  विविध रोगांवर डॉक्टर देखील त्याचे सेवन करण्याची शिफारस करतात. बाजारात कारल्याला नेहमीच मागणी असते. शिवाय कारल्याला पावसाळ्यात देखील चांगली मागणी असते आणि बाजार भाव देखील चांगला समाधानकारक मिळतो. अशा परिस्थितीत या भाजीपाल्याची पेरणी करून शेतकऱ्यांना अल्पावधीत चांगला नफा मिळू शकतो.

हिरवी मिरची आणि कोथिंबीर

हिरवी मिरची आणि कोथिंबीर बारामाही बाजारपेठेत मागणी मध्येअसते. या दोन्ही पिकांसाठी वालुकामय चिकणमाती किंवा लाल माती असलेली शेती जमीन चांगली असल्याचे सांगितले जाते. अशा जमिनीत या पिकांची लागवड केल्यास निश्चितच शेतकरी बांधवांना चांगले उत्पादन मिळू शकते. हिरवी मिरची आणि कोथिंबिर पावसाळ्यात किचन किंवा टेरेस गार्डनमध्येही लागवड करता येते. या दोन्ही पिकांना पावसाळ्यात देखील मागणी असल्याने बाजारपेठेत समाधानकारक भाव या दोन्ही पिकांना मिळतो. या परिस्थितीत या दोन्ही पिकांची शेती शेतकरी बांधवांना चांगले उत्पन्न मिळवून देऊ शकते.

[ad_2]

आम्ही कास्तकार.कॉम वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा. तसेच शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करू शकता.

Share via
Copy link