50 लाख रुपयापर्यंत मिळेल कर्ज,स्टार किसान घर योजना ! - Amhi Kastkar
Agriculture News in Marathi

50 लाख रुपयापर्यंत मिळेल कर्ज,स्टार किसान घर योजना !

1
4.1/5 - (10 votes)

बँकेच्या या नवीन योजनेमुळे शेतकऱ्यांचे घर होऊ शकते स्टार सारखे ! आता कर्ज मिळणे झाले आणखीनच सोपे. शेतकऱ्यांना सोप्या पद्धतीने आणि सहज कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी अनेक बँका आकर्षक योजना राबवत असतात याच पैकी एक नवीन योजना शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे आलेली आहे. ही योजना म्हणजेच ‘स्टार किसान घर योजना’. बँक ऑफ इंडियाने शेतकऱ्यांच्या सोयीसाठी ही नवीन योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी नवीन घरबांधणीसाठी आणि जुन्या घराच्या दुरुस्ती साठी कर्ज घेऊ शकतात. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पन्नास (loan for farmer)लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकते. बँक ऑफ इंडियाच्या चार किसान घर योजनेने शेतकऱ्यांमध्ये एक नवी आकांशा निर्माण झाली आहे . शेतकरी बांधवांनो आजच्या या लेखामध्ये आपण या योजनेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. (Home loan for farmer)

स्टार किसान घर योजनेबद्दल माहिती : (star kisan ghar yojana)

योजनेच्या नावावरून आणि या योजनेबाबत असेच वाटते की ताऱ्यासारखे चमकेल आता माझ्या शेतकरी राजा चे घर! म्हणूनच तर हेच(home loan)नाव आहे स्टार किसान घर योजना ! (Bank of india)
स्टार किसान घर योजना ही बँक ऑफ इंडियाने शेतकऱ्यांच्या हितार्थ राबवलेली एक योजना आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्याच्या घर बांधण्यासाठी तसेच जुन्या घरांच्या दुरुस्तीसाठी अत्यंत कमीत कमी व्याजदरात कर्ज मिळू शकते. कर्ज परतफेड करण्याची मुदत ही पंधरा वर्षापर्यंतच्या कालावधीची असल्यामुळे या योजनेचा आणखीनच लाभ होणार आहे. या योजनेची(maharashtra yojana)आणखी एक विशेष बाब म्हणजे यामध्ये शेतकऱ्यांना इन्कम टॅक्स रिटर्न देण्याची गरज भासणार नाही.(maharashtra new loan yojana)

योजने बद्दल अधिक माहिती साठी या नंबर वर संपर्क करू शकता:

बँक ऑफ इंडियाच्या स्टार किसान घर (home loan schame) योजनेबाबत अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या जवळच्या किंवा तुमचे बँक खाते असलेल्या बँक ऑफ इंडियाच्या शाखेमध्ये याबद्दल विचारू शकता .किंवा बँकेचा टोल फ्री क्रमांकावर देखील संपर्क करू शकता. बँकेचा टोल फ्री क्रमांक आहे. (1800 103 1906)

किती रुपया पर्यंत मिळू शकते का कर्ज ?

  • शेतकऱ्याच्या घरामध्ये दुरुस्ती किंवा नवीन घर बांधण्यासाठी शेतकऱ्यांना एक लाख रुपयांपासून ते दहा लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाईल.
  • जर शेतकऱ्याला त्याच्या जमिनीवर नवीन फार्महाऊस किंवा घर बांधण्यासाठी बँकेकडून एक लाख ते 50 लाख रुपयाचे कर्ज मिळू शकते.
  • बँक ऑफ इंडियाच्या या योजने अंतर्गत शेतकऱ्यांसाठी एक लाख ते पन्नास लाख रुपयांपर्यंतची कर्जाची तरतूद केलेली आहे.

स्टार किसान घर योजनेच्या कर्जावरील व्याज दर किती ?

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एक लाख ते पन्नास लाख रुपयांपर्यंतचे कर्ज 8.05 टक्के व्याजदराने मिळणार आहे आणि व्याज परत फेडण्याची मुदत ही पंधरा वर्षाची असल्यामुळे व्याज परतफेड करणे शेतकरी बांधवांना सोपे जाईल.

या योजनेसाठी पात्र शेतकरी :

  • -बँक ऑफ इंडिया मध्ये खाते असणाऱ्या शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
  • -त्याच बरोबर बँक ऑफ इंडिया मध्ये kcc खाते असणेही आवश्यक आहे.
  • स्वतःच्या मालकीची शेत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळेल.
  • कृषी क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या शेतमजूर, शेतकरी यांनाच या योजनेचा लाभ मिळेल.
Share via
Copy link