शेती करणार्‍यांनाही मिळते पेन्शन, जाणुन घ्या पंतप्रधान किसान मानधन योजनेबाबत

आम्ही कास्तकार :

आपण शेती करत आहात का ? तर मग शेतकरी या नात्याने आपण आपले रिटायरमेंट पण प्लॅन करू शकता आणि वयाच्या ६० वर्षांनंतर दरमहा ३ हजार रुपयांपर्यंत मासिक पेन्शन मिळवू शकता.पंतप्रधान किसान मानधन योजनेअंतर्गत खाते उघडून आपण याचा लाभ घेऊ शकता.१८ ते ४० वय वर्षे असलेले लोकं या योजनेत सहभागी होऊ शकतात. आतापर्यंत या योजनेत एकूण २०,१३,९१३ लोक जोडले गेले आहेत.चला तर मग जाणून घेऊयात या योजनेचे फायदे काय आहेत आणि आपण त्यामध्ये कसे सहभागी होऊ शकता याबद्दल,

काय आहेत या योजनेचे फायदे
शेतकऱ्यांना वृद्धपकाळात मदत म्हणून हि योजना सुरु करण्यात आलेली आहे.

या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी आपली जमीन हि २ हेक्टरपेक्षा जास्त नसावी हि अट ठेवण्यात आलेली आहे.राज्य किंवा केंद्र शासित प्रदेश भूमी रेकॉर्ड ०१-०८-२०१९ पर्यंत ज्याची नावे आहेत ते यामध्ये सहभागी होण्यासाठी अप्लाय करू शकतात.या योजनेअंतर्गत व्हायच्या ६० वर्षानंतर शेतकऱ्यांना दरमहा ३ हजार मासिक पेन्शन मिळतील.या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी भरावयाच्या प्रीमियम बद्दल बोलायचे झाल्यास जर तुमचे वय वर्षे १८ असेल तर तुम्हांला दरमहा ५५ रुपये भरावे लागतील आणि जर तुम्ही ४० वय वर्षात सहभागी होतंय तर तुम्हाला रुपये २०० प्रति महिना भरावे लागतील.

असा करायचंय अर्ज
यासाठी आपल्याला जवळच्या नागरी सुविधा केंद्रात जावे लागेल.आपल्या जवळ आधार कार्ड आणि बँक खात्याचे डिटेल्स असणे गरजेचे आहे.पहिला हफ्ता तुम्हांला येथूनच भरावयाचा आहे.आधार कार्डच्या ऑथेंटीकेशन नंतर तूमचे रेजिस्ट्रेशन होऊन जाईल.यानंतर दर महिन्याला ऑनलाईनच तुमच्या खात्यातूनच पेमेंट कट केले जाईल.तूमचे रेजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यावर तुमचा अकाउंट नंबर तयार होईल आणि तुम्हाला तुमचे शेतकरी कार्ड मिळून जाईल.

हे पण वाचा :

Leave a Comment

X