किसान रथ अँप काय आहे?
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शेतमाल वहातुकीची होणारी अडचण ध्यानात घेत केंद्र सरकारने किसान रथ मोबाईल अॅपचे लॉंचिग केले आहे. केंद्रीय कृषी आणि आणि शेतकरी कल्याण मंत्री (Union Agriculture Minister) नरेंद्र सिंह तोमर यांनी या किसान रथ अॅपचे (Kisan Rath Mobile App) उद्धघाटन केले आहे. यामुळे शेतकरी आणि बाजार मंडई दोन्ही बाजू जोडल्या गेल्या आहेत. या अॅपचा उपयोग करुन तुम्ही घरी बसल्या ट्रक, ट्रॅक्टर, आणि इतर कृषीसाठी लागणारे साहित्य मागवू शकता.
अनेक विशेषता असलेल्या या अॅपमध्ये हायरिंग सेंटरही आहेत. साधारणतः १४ हजारपेक्षा अधिक हायरिंग सेंटर या अॅपवर आहेत. याद्वारे आपण शेतीसाठी लागणारी इतर अवजारे मागवू शकता. यात २० हजारपेक्षा अधिक ट्रॅक्टर रजिस्टर्ड आहेत. यामुळे शेतकऱ्यांसह ट्रान्सपोर्टला काम मिळेल. या अॅपमुळे दोन्ही बाजूंना काम मिळणार आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ, नये यासाठी सरकारकडून यावर नियंत्रणही ठेवले जाईल.
शेती उत्पादनांची वाहतूक करणे हा पुरवठा साखळीचा आवश्यक आणि अपरिहार्य घटक आहे. लॉकडाऊनमुळे सध्याच्या गंभीर परिस्थितीत “किसान रथ” शेतकरी, गोदामे, एफपीओ, एपीएमसी मंडळे आणि राज्यांतर्गत तसेच आंतरराज्य खरेदीदारांमधील सहज आणि अखंड पुरवठा साखळी सुनिश्चित करेल. वेळेवर वाहतूक सुविधा मिळाल्यामुळे अन्नाची नासाडी कमी होईल. नाशवंत वस्तुंना चांगला भाव मिळण्यासही हे उपयुक्त ठरेल. या अॅपची विशेषता म्हणजे हे अॅप इंग्रजी, हिंदी, गुजराती, मराठी, पंजाबी, कन्नड, आणि तेलुगू या भाषांमध्ये उपलब्ध आहे.
असे डाऊनलोड करा आणि यापध्दतीने वापर करा (Download Kisan Rath Mobile App)
- गुगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड केल्यानंतर आपल्या भाषेची निवड करावी.
- आपले नाव, मोबाईल नंबर आणि आधार नंबर ही माहिती त्यात भरावी.
- जर तुम्ही व्यापारी आहात तर आपल्याला कंपनीचे नाव, आपले नाव आणि मोबाईल नंबर टाकून नोंदणी करावी लागेल.
- त्यानंतर आपल्या मोबाईल नंबरवर एक पासवर्ड येईल. त्यानंतर आपली नोंदणी पूर्ण होईल.
- यानंतर शेतकरी आपल्या शेतमालाच्या वाहतुकीसाठी ट्रक आणि ट्रॅक्टरची ऑनलाईन बुकिंग करु शकतील.
वाहतुकीसाठी ऑनलाईन बुकिंग करण्याची प्रक्रिया
- अॅप उघडा, त्यात लॉगिन करा आणि सविस्तर माहिती भरा.
- आता कामाची तारीख आणि माहितीची निवड करा.
- यात आपण आपल्या गरजांविषयी माहिती देऊ शकता.
- त्यानंतर संबंधित सेवा देणाऱ्या व्यक्तीशी संपर्क करून त्यांच्याकडून उत्तर मिळवा.
याप्रमाणे आपल्या वाहतुकीच्या व्यवहाराला पुर्ण रुप दिले जाईल. किसान रथ मोबाईल अॅप एंड्रॉयड स्मार्टफोनवर डाऊनलोड करता येईल.
हे पण वाचा :
- Ram Navami SMS Marathi : रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा 2024 | Status, Wishes, Quotes, Photos Download १७ एप्रिल २०२४
- Ram Navami 2024 : राम नवमीच्या शुभेच्छा, WhatsApp Status, Wishes, GIF & Photos Download
- रब्बी हंगाम पीक विमा 2023-24 निधी मंजूर झाला 3 GR डाऊनलोड करा | rabbi pik vima 2023-24 Crop Insurance
- रूफटॉप सोलरसाठी अर्ज करा, लॉगिन करा, किंमत यादी
- अर्ज फॉर्म, यूपी सौर ऊर्जा योजना