महाराष्ट्रात कुसुम सोलर पंप योजनेचा नवीन कोटा ;असा करा अर्ज : - Amhi Kastkar
Agriculture News in Marathi

महाराष्ट्रात कुसुम सोलर पंप योजनेचा नवीन कोटा ;असा करा अर्ज :

4
4.5/5 - (2 votes)

कुसुम सोलर पंप योजनेचा नवीन कोटा महाराष्ट्रात आलेला आहे . महाराष्ट्रातील तळागडयातील शेतकऱ्यांसाठी ही योजना म्हणजे जन्माचे दारिद्र फिटल्या सारखेच आहे.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. या योजनेअंतर्गत एससी(SC) , एसटी (ST)कॅटेगिरीतील लाभार्थ्यांसाठी 95 टक्के अनुदान देण्यात आले आहे. तसेच इतर कॅटेगिरीतील (open)(obc)लाभार्थ्यांसाठी 90 टक्के अनुदान उपलब्ध आहे. तर या योजनेबाबतची संपूर्ण माहिती आजच्या या लेखामध्ये आपण पाहणार आहोत.(kusum solar pump yojana latest update) यात २.५ एकर क्षेत्र धारण करणाऱ्या शेतकऱ्याचे ३ HP , ५ एकर क्षेत्र धारण करणाऱ्या शेतकऱ्यांची ५ HP व त्यापेक्षा जास्त क्षेत्र धारण करणाऱ्या शेतकऱ्याच्या ७.५ HP डीसी पंप स्थापित करण्यात येणार आहेत .(new update about kusum solar pump yojana 2022)

बघा तुमच्या गावाचे नाव ‘सेफ व्हिलेज लिस्ट’ मध्ये आहे का ?

कुसुं सोलार पंप योजनेमध्ये ‘सेफ व्हिलेज लिस्ट’ (safe village list)फॉर्म भरताना चा एक पर्याय असतो. सेफ विलेज लिस्ट म्हणजे नेमकं काय ? तर, घाबरून जाण्यासारखे कोणतेही कारण नाहीये, ‘व्हिलेज लिस्ट’ म्हणजे ज्या भागामध्ये महावितरणची वीज उपलब्ध नाही आहे असा विभाग. अशी क्षेत्र म्हणजेच सेफ व्हिलेज लिस्ट तर शेतकरी बांधवांनो तुमच्या गावाचे नाव ते व्हिलेज लिस्ट मध्ये असल्यास तुम्ही कुसुं सोलार पंप योजनेचा फॉर्म डायरेक्ट भरू शकता. तुमच्या गावाचे नाव या लिस्टमध्ये नसल्यास तुम्हाला असा पर्याय निवडावा लागेल. (Kusum solar pump yojana maharashtra)

2022 मधील सोलार पंपाची किंमत:

1) अनुदान नसलेल्या सोलार पंपाची किंमत:

3 एचपी च्या पंपासाठी GST सह 178097 रु.,

5Hp पंपसाठी 253205 रु.,

7.5 Hp पंपसाठी 390903 रु.

एवढा प्रति पंप असणार आहे. (Kusum Solar Pump Online Form)
वरील किंमत ही अनुदान विरहित किंमत आहे .(kusum solar pump yojana maharashtra)


2) अनुदान धारण शेतकऱ्यांसाठी म्हणजेच कुसुंम सोलार पंप योजनेच्या लाभार्थ्यांसाठी या पंपाची एकूण किंमत एचपी धारणेनुसार खालील प्रमाणे देण्यात आली आहे.
यामध्ये लाभार्थी हिस्सा खुला प्रवर्गासाठी

  • 3Hp Pump मूळ किंमत 15650 रु. GST 13.8% एकूण 17810 रु.
  • 5Hp मूळ किंमत 22 हजार 250 रुपये जीएसटी 3 हजार 71 रुपये.एकूण 25321 रु.
  • 7.5 Hp पंप 34 हजार 350 रुपये जीएसटी 4 हजार 740 रुपये एकूण 39 हजार 990 रुपये.

अनुसूचित जाती अनुसूचित जमाती

  • -3 एचपी पंपासाठी 7 हजार 825 रुपये. जीएसटी 1080 रुपये एकूण 8 हजार 905 रुपये.
  • 5 एचपी पंपासाठी 11 हजार 125 रुपये जीएसटी 1535 रुपये एकूण 12 हजार 660 रुपये.
  • -7.5 एचपी पंपासाठी मूळ किंमत 17 हजार 175 रुपये जीएसटी 2 हजार 370 रुपये आणि एकूण 19 हजार 545 रुपये
  • अशाप्रकारे कॅटेगिरी नुसार आणि पंपाच्या एचपी नुसार तुमच्या सोलार पंपाची किंमत तुम्हाला पडणार आहे.(kusum solar pump price) (online form for kusum solar pump yojana)
Share via
Copy link