शेताच्या बांधावर लावली आहेत का तुम्ही नारळाची झाडे ?
तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे.
केंद्रातील मोदी सरकार यांनी नारळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा निर्णय घेतला आहे .
बॉल खोबर आणि मिलिंग खोबर अशा दोन्ही च्या एम एस पी मध्ये केंद्र सरकारने वाढ केली आहे.
बहुतांशी शेतकरी आपल्या शेताच्या बांधावर झाडे लावतात आणि त्याच्या पासून भरघोस उत्पन्न घेतात अश्या शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.
एम एस पी मध्ये झालेली वाढ
2022 या वर्षासाठी खोबऱ्याचा एम एस पी वाढवण्यात आला आहे.
-2021 पर्यंत खोबरयासाठीचा MSP 10,335 रुपये एवढा होता तर आता त्याची किंमत 10,590 रुपये इतकी करण्यात आली आहे.
-बॉल खोबऱ्याचा MSP दहा हजार सहाशे प्रतिक्विंटल वरून अकरा हजार रुपये प्रतिक्विंटल करण्यात आला आहे
-अशाप्रकारे बॉल खोबर्याच्या एम एस पी मधील चारशे रुपये प्रति क्विंटल आणि खोबऱ्याचा MSP मध्ये 225 रुपये प्रति क्विंटल वाढ करण्यात आली आहे.
हा निर्णय कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर झालेला आहे.