LPG GAS : आता घरगुती गॅस सिलेंडर वर “QR CODE” बसवणार,जाणून घ्या फायदे आणि कस काम करणार - Amhi Kastkar

LPG GAS : आता घरगुती गॅस सिलेंडर वर “QR CODE” बसवणार,जाणून घ्या फायदे आणि कस काम करणार

5/5 - (6 votes)

नमस्कार मित्रांनो, मित्रांनो घरगुती म्हणजे एलपीजी सिलेंडर बाबत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता प्रत्येक गॅस सिलेंडर क्यूआर कोड दिला जाणार आहे. येत्या तीन महिन्यात क्यूआर कोड असलेले एलपीजी गॅस सिलेंडर देशभरात उपलब्ध होतील. 

हे पण वाचा : Shinde Fadnavis Goverment | शिंदे-फडवणीस सरकार 1 लाख रोजगार देणार । शिंदे-फडवणीस सरकारचा मोठा निर्णय…

बऱ्याचदा टाकीतून गॅस चोरीचे प्रकार घडतात. त्याच्यावर कुठलीही तक्रार आणि कारवाई घडत नाही. एलपीजी गॅस सिलेंडर बाबत अनेक प्रश्न निर्माण होतात पण त्याची उत्तरे कुठेच मिळत नाही. असे प्रकार रोखण्यासाठी केंद्र सरकारने आधार कार्ड प्रमाणे प्रत्येक गॅस सिलेंडर क्यूआर बसण्याचा निर्णय घेतला आहे. आता या क्यूआर कोड च्या मदतीने या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळणार आहे.

असे वापरा सिलेंडर वरील QR CODE 

  • सुरुवातीला सिलिंडरवरील क्यू आर कोड आपल्या स्मार्टफो ने स्कॅन करा. 
  • स्कॅन केल्यानंतर स्क्रीनवर डिस्प्ले दिसेल, याद्वारे तुम्हाला माहिती मिळेल की या सिलेंडर ला कोणत्या प्लांट वर भरण्यात आले आहे. 
  • स्क्रीनवर हेही दाखवले जाईल की सिलेंडरचा डिस्ट्रीब्यूटर कोण आहे. 

हे पण वाचा : Samaj Kalyan Yojna | गणवेश, बूट साठी या विद्यार्थ्यांच्या खात्यात अनुदान

QR CODE चे फायदे

  1. क्यआर कोड मुळे सिलेंडर चे वजन, एक्सपायरी डेट सारखी डिटेल्स माहिती मिळू शकते. 
  2. क्यूआर कोड मुळे ग्राहकांना सिलेंडरच्या लोकेशन ची माहिती मिळेल. 
  3. गॅस सिलेंडर कोठे उभारण्यात आलेला आहे याची माहिती घेता येईल. 
  4. किती वेळा गॅस रिफील केला, तसेच रिफिलिंग सेंटर मधून घरपोच गॅस मिळण्यास किती वेळ लागला हेही समजेल. 
  5. सिलेंडर मधील गॅस चोरी होत असल्यास त्याचा मार्ग काढणे सोपे होईल. 
  6. गॅस सिलेंडर चे नाव समजणार असल्याने घरगुती गॅसचा व्यावसायिक कामासाठी वापर करता येणार नाही. 

2 thoughts on “LPG GAS : आता घरगुती गॅस सिलेंडर वर “QR CODE” बसवणार,जाणून घ्या फायदे आणि कस काम करणार”

Leave a Comment

Share via
Copy link