Mahabeej should supply seeds to Nagpur for kharif season


खरीप हंगामासाठी महाबीजने नियोजन केल्याप्रमाणे नागपूर जिल्ह्यासाठी २० हजार ५०० क्विंटल बियाणांचा पुरवठा करावा, अशी मागणी पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी केली.

खरीप हंगाम, बियाणे, खते, पीक कर्ज इत्यादींच्या नियोजनासंदर्भात खरीप हंगाम आढावा बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या एनआयसी सेंटर येथून डॉ.राऊत यांनी नागपूर जिल्ह्यासंबंधित खरीप हंगामाविषयी माहिती दिली. जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे, विभागीय आयुक्त डॉ.संजीव कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, विभागीय कृषी सह संचालक रविंद्र भोसले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलींद शेंडे तसेच संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.

कांदा जीवनावश्यक वस्तूत टाकणारा महामुर्ख कोण आहे, त्याला शोधलं पाहिजे – बच्चू कडू

जिल्ह्यात ५ लाख १०० हेक्टरवर खरीप पिकांचे नियोजन आहे. यात कापूस, भात, तूर आणि सोयाबीन ही मुख्य पीके आहेत. जिल्ह्यात खतांची उपलब्धता ८० हजार ६५२ मेट्रिक टन असून १४ हजार ४९१ टन खत विक्री झाले आहे. ५८ हजार ६५९ टन खत शिल्लक आहे. बियाणांमध्ये १३ हजार ११४ क्विंटल सोयाबीन, कापूस २ लाख ९५ हजार ५२ पॅकेट, तूर बियाणे १११७ क्विंटल व ७ हजार ८९८ क्विंटल धान बियाणे उपलब्ध असल्याची माहिती पालकमंत्र्यांनी यावेळी दिली.

कांदा बाजार लवकरच सुरू करण्यासाठी सुप्रिया सुळेंकडून पाठपुरावा सुरुSource link

Leave a Comment

X