MahaDBT खते व बियाणे अनुदान योजना ऑनलाईन अर्ज । बियाण्यांवर मिळवा ५०% ते १००% अनुदान - Amhi Kastkar
Agriculture News in Marathi

MahaDBT खते व बियाणे अनुदान योजना ऑनलाईन अर्ज । बियाण्यांवर मिळवा ५०% ते १००% अनुदान

0
4.6/5 - (7 votes)

MahaDBT Seeds subsidy scheme 2022: शेतकरी बंधुंनो खरीप बियाणे अनुदान योजना संदर्भातील Online अर्ज आता मोबाईलवरून देखील भरता येणार आहे या संदर्भातील माहिती जाणून घेवूयात. शेतकरी बांधव आता खरीप बियाण्यासाठी Online अर्ज करू शकतात आणि शासकीय अनुदानाचा लाभ घेऊ शकतात.

प्रमाणित बियाणांची वितरण, पीक प्रात्यक्षिके, सुधारित कृषी अवजारे, सिंचन सुविधा यासाठी ज्या शेतकऱ्यांना Online अर्ज करायचा आहे दिनांक २५ मे २०२२ पर्यंत MahaDBT या पोर्टलवर अर्ज करू शकतात. हा अर्ज मोबाईलवरून देखील केला जाऊ शकतो. मोबाईलचा उपयोग करून हा अर्ज कसा सादर करावा या संदर्भातील माहिती या लेखाच्या खाली दिलेली आहे.

खरीप बियाणे अनुदान योजना किंवा इतर कोणत्याही योजनेचा अर्ज भरा तुमच्या मोबाईलवरून:
वरील उल्लेख केलेल्या विविध योजनेसाठी किंवा MahaDBT वरील कोणत्याही योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर त्यासाठी कोणतेही विशेष लायसन्स किंवा आयडी लागत नाही. शेतकरी त्यांच्या मोबाईलवरून हा अर्ज स्वतः सादर करू शकतात. तुमच्या मोबाईलचा उपयोग करून तुम्ही देखील मोबाईलवरच अर्ज सादर करू शकता. शेतकऱ्यांनी या अगोदर जर MahaDBT पोर्टलवर नोंदणी केली नसेल तर नोंदणी कशी करावी, अर्ज कसा सादर करावा, योजना कशी निवडावी ही आणि इतर माहिती या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.

MahaDBT पोर्टलवर सर्व योजनांसाठी एकच अर्ज

शेतकऱ्यांना सर्व योजनांचा लाभ मिळावा यासाठी कृषी विभागाच्या वतीने MahaDBT शेतकरी पोर्टलची निर्मिती करण्यात आलेली आहे. या पोर्टलवर शेतकरी अनेक योजनांसाठी एकच अर्ज करू शकतात. MahaDBT पोर्टल सुरु झाल्यापासून अनेक शेतकरी त्यांचे अर्ज करतांना दिसत आहेत. एकाच अर्जात अनेक योजनांचा लाभ घेता येत असल्यामुळे हि प्रक्रिया अतिशय सोयीची आणि पारदर्शक झालेली आहे.

Online पद्धतीने अर्ज सुरू – MahaDBT Online Application

यापूर्वी शेतकऱ्यांना शेती संबधित योजनांचा लाभ घेण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी कृषी कार्यालयात जावून अर्ज करावा लागत असे. यासाठी शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही खर्च होत असे, शिवाय अर्ज कोठून घ्यावा, कोठे करावा, कोणत्या अधिकाऱ्याकडे करावा, हि माहिती सर्वसामान्य शेतकऱ्याला नसल्यामुळे ते या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता जास्त निर्माण होत होती परंतु आता MahaDBT पोर्टल सुरु झाल्यापासून अनेक शेतकरी विविध विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी एकच अर्ज करत असल्यामुळे अनेक शेतकरी या योजनांचा लाभ घेतांना दिसत आहेत.

खरीप बियाणे अनुदान योजना संदर्भातील माहिती

योजनेचे नाव:
MahaDBT शेतकरी योजना ( खरीप बियाणे अनुदान योजना )

योजनेतून मिळणारे फायदे:
खरीप बियाण्यावर एकूण किमतीच्या 50 टक्के मर्यादेत अनुदान देय राहील.

अर्ज सादर करण्याची पद्धत: Online

वेबसाईट लिंक या पोस्टच्या सर्वात खाली दिली आहे. सर्वात आधी पद्धत व्यवस्थित समजून घ्या आणि नंतर च अर्ज भरायला सुरुवात करा

आवश्यक कागदपत्रे: Required Documents fo Biyane Anudan

 1. एकूण जमिनीचा दाखला,
 2. आधार कार्ड,
 3. पॅन कार्ड,
 4. बँक पासबुक.

मोबाईल फोनवर बियाणे व कृषी अवजरासाठी Online अर्ज करण्याची पद्धत.

 • तुमच्या मोबाईलमधील प्ले स्टोअर उघडा.
 • प्ले स्टोअरच्या सर्च बारमध्ये puffin हा कीवर्ड टाका.
 • puffin हे ब्राउजर तुमच्या मोबईलमध्ये इंस्टाल करा आणि ओपन करा.
 • ब्राउजर ओपन केल्यानंतर त्या ब्राउजरच्या सर्च बार मध्ये टाईप mahadbt कीवर्ड टाका.
 • तुमच्या मोबाईलमध्ये mahadbt हे शेतकरी पोर्टल ओपन होईल या ठिकाणी पेजला थोडे झूम करा. पेजला झूम केल्यावर या ठिकाणी लॉगीन करण्याचा पर्याय दिसेल त्यावर टच करा.

 • तुमचा युजरआयडी, पासवर्ड आणि कॅपचा कोड दिलेल्या चौकटीमध्ये टाका.
 • जर तुमचे MahaDBT वर Registration केले नसेल तर इथे क्लिक करून नोंदणी करा
 • जसेही तुम्ही आवश्यक असलेली माहिती दिलेल्या चौकटीमध्ये टाईप कराल त्यावेळी तुम्ही लगीन व्हाल.
 • डॅशबोर्डची भाषा जर इंग्रजी असेल तर त्याला मराठी सिलेक्ट करा.
 • अर्ज करा या बटनावर क्लिक करा.
 • दिलेल्या पर्यायांपैकी बियाणे औषधे व खते या पर्यायासामोरील बाबी निवडा या बटनावर टच करा.

 • तालुका, गाव, सर्वे नंबर हि माहिती अगोदरच या ठीकानी आलेली असेल ती तपासून घ्या.
 • मुख्य घटक या खालील चौकटीमध्ये अनुदानावर बियाणे, औषधे व खते हा पर्याय निवडा.
 • बाब निवडा या पर्यायाच्या खाली चौकटीमध्ये बियाणे हा पर्याय निवडा.
 • पिक निवडा या पर्यायाच्या खाली दिलेल्या चौकटीवर टच करा. या ठिकाणी तुम्हाला विविध पिकांची यादी दिसेल त्यामधून एक पिक निवडा.
 • अनुदान हवी असलेली बाब या पर्यायाच्या खाली दिसत असलेल्या चौकटीवर टच करा. प्रमाणित बियाण्याचे वितरण किंवा पिक प्रात्यक्षिक या पैकी एकज पर्याय निवडा.

 • बियाण्यांच्या प्रकारामध्ये उच्च उत्पादनक्षम बियाणे हा पर्याय निवडा.
 • खत निवडा हा पर्याय या ठिकाणी लागू होत नाही त्यामुळे या ठिकाणी कोणतीच माहिती तुम्हाला भरायची नाही.
 • वाण निवडा या पर्यायावर टच करतात या ठिकाण जुने किंवा नवे वाण शेतकऱ्याने निवडणे आवशयक आहे.
 • वाण या पर्यायावर टच करताच विविध वाण शेतकऱ्यांना दिसतील,हवे असलेले वाण या ठिकाणी शेतकरी निवडू शकतील.
 • एकूण क्षेत्र हि माहिती या ठिकाणी अगोदरच आलेली असेल

 • क्षेत्र ( हेक्टर ) या पर्यायाला टच करून जेवढ्या क्षेत्रासाठी तुम्हाला बियाणे हवे आहे तितके क्षेत्र निवडा.
 • अंदाजित आवश्यक बियाणे या पर्यायामध्ये तुम्ही निवडलेल्या क्षेत्रानुसार बियाणे किलोग्रॅममध्ये या ठिकाणी दिसेल.
 • शेतकरी बंधुनो तुम्ही ज्या वाणासाठी अर्ज करत आहात ते वाण न मिळाल्यास जे वाण कृषी विभागाकडे उपलब्ध होईल ते वाण शेतकऱ्यांना देण्यात येईल हि अट या ठिकाणी देण्यात आलेली आहे. ती अट मान्य करण्यासाठी दिलेल्या चौकटीमध्ये टिक करा.
 • सर्वात शेवटी जतन करा या हिरव्या रंगाच्या बटनावर टच करा.

अर्ज सादर करण्याची पद्धत – How to Apply for MahaDBT Seeds Subsidy

शेतकरी बंधुंनो अशा पद्धतीने या ठिकाणी बियाण्यासाठी अर्ज जतन करण्यात आलेला आहे परंतु हा अर्ज अजून सादर झालेला नाही. अर्ज सादर करण्यासाठी खालील पद्धतीचा अवलंब करा.

 • वेबसाईटच्या मुख्यमेनूवर जा.
 • अर्ज करा या बटनाला टच करा.
 • पहा या बटनाला टच करा.
 • जितक्या योजनांसाठी शेतकऱ्याने Online अर्ज केलेला आहे त्या प्राधान्यक्रमांक द्या.
 • अर्ज सादर करा या बटनाला टच करा.
 • आपण घटकासाठी अर्ज सादर केलेला आहे असा संदेश तुम्हाला येईल म्हणजेच तुमचा अर्ज सादर झालेला आहे.

👉MahaDBT शेतकरी योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी👈

finger down

👉👉इथे क्लिक करा👈👈

Mahadbt Biyane Anudan Yojana 2022
Share via
Copy link