Chance Of Rains In Konkan And Marathwada In Next Four-five Days Says Meteorological Department | Maharashtra Weather Update : कोकण आणि मराठवाड्यात येत्या चार- पाच दिवसात मुसळधार पावसाची शक्यता : हवामान विभाग
Agriculture News in Marathi

Maharashtra Weather Update : कोकण आणि मराठवाड्यात येत्या चार- पाच दिवसात मुसळधार पावसाची शक्यता : हवामान विभाग

0
5/5 - (2 votes)

Maharashtra Monsoon Update : गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या तप्त झळा आणि घामाच्या धारांनी हैराण झालेल्या नागरिकांना लवकरच दिलासा मिळणार आहे. येत्या चार- पाच दिवसात पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.  यामुळे उष्मा घाताने त्रासलेल्या नागरिकांना तुर्तास तरी दिलासा मिळाणार आहे. (Maharashtra weather update) यंदा मान्सून वेळेआधीच दाखल होणार आहे. कालच मान्सून अंदमानात दाखल झाला आहे. तर 27 मे रोजी तो केरळात दाखल होण्याची शक्यता आहे. 

पुणे हवामान विभागाचे प्रमुखे कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विट करत यासंबंधी माहिती दिली आहे. 17 ते 21 मे दरम्यान दक्षिण मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचवेळी उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.

मान्सूनच अंदमानात आगमन 

अंदमानच्या समुद्रात काल (सोमवारी) मान्सून दाखल झाल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागानं दिली आहे. नैऋत्य मान्सून अंदमानच्या समुद्रात दाखल झाला आहे. सहा दिवस आधीच 16 मे रोजी मान्सून अंदमानच्या समुद्रात दाखल झाला आहे. 27 मे रोजी मान्सून (Monsoon) केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज आहे. मात्र त्याआधीच मान्सून दाखल होण्याची शक्यता अधिक वर्तवली जात आहे. केरळ आणि लक्षद्वीपमध्ये 18 मे पर्यंत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

 महाराष्ट्रातील 9 राज्यांना यलो अलर्ट – Yellow alert for 9 states

दरम्यान, कोकण किनारपट्टीसह राज्यातील 9 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात देखील अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पुढच्या दोन दिवसात केरळ किनारपट्टीवर मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 16 ते 19 मे दरम्यान, महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.  16 ते 19 मे दरम्यान, महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पश्चिम महाराष्ट्रासह, मराठवाडा आणि कोकणात पावसाची शक्यता सांगण्यात आली आहे.

हे पण वाचा –

Chance Of Rains In Konkan And Marathwada In Next Four-five Days Says Meteorological Department
Share via
Copy link