Mahavitaran Load Shedding: महावितरणचे लोड शेडिंगचे नवीन वेळापत्रक जाहीर! डाउनलोड करा तुमच्या जिल्ह्याचं वेळापत्रक - Amhi Kastkar
Agriculture News in Marathi

Mahavitaran Load Shedding: महावितरणचे लोड शेडिंगचे नवीन वेळापत्रक जाहीर! डाउनलोड करा तुमच्या जिल्ह्याचं वेळापत्रक

0
4.9/5 - (13 votes)

महाराष्ट्रात अनेक दिवसांपासून वीजेचे संकंट घोंघावत आहे. ग्रामीण भागात शेतकऱ्यांची वीज कापली जात आहे. लाईट बील (Light Bill) भरा असे आवाहन राज्य सरकारकडून (State Government) करण्यात येत आहे. देशात सध्या कोळशाची कमतरता आहे. त्यामुळे वीजनिर्मीतीला अडथळा येत आहे. उन्हाळा लवकर सुरू झाल्यामुळे विजेच्या मागणीत वाढ होत असताना, गुजरात आणि आंध्र प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्राला लवकरच ब्लॅकआउट किंवा लोडशेडिंगचा सामना करावा लागू शकतो. म्हणून आता महावितरणने (mahavitaran) लोडशेडिंगचे वेळापत्रक जारी केले आहे.

इथे क्लिक करून वेळापत्रक पाहा

finger down

सविस्तर वेळापत्रक पहा

महाराष्ट्रात काही भागात दिवसा आठ तास तर काही भागात रात्री आठ तास वीज मिळणार आहे. खालच्या PDF मध्ये तुम्हाला समजेल की तुमच्या भागात कोणत्या वेळी लाईट असणार आहे. संबंधीत वेळापत्रक हे एप्रिल 2022 पासून जून 2022 पर्यंत लागू असणार आहे. संबंधीत वेळापत्रक 1 एप्रिलपासून लागू झाले आहे.

लोडशेडिंगमुले मिळणार इतकेच तास वीज :

दरम्यान राज्याची मागणी आधीच 28,589 मेगावॅटवर पोहोचली आहे, जी लवकरच 30,000 मेगावॅटपर्यंत वाढू शकते. वीज मागणी विक्रमी 8.2 टक्क्यांनी वाढली आहे. मुंबईची मागणी 3400 मेगावॅट आहे, ती आणखी वाढू शकते अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

ब्लॅकआउट किंवा लोडशेडिंग टाळण्यासाठी, राज्य मंत्रिमंडळाने शुक्रवारी येथे झालेल्या विशेष बैठकीत राज्य संचालित वीज वितरण कंपनी महावितरणला कोस्टल गुजरात पॉवर लिमिटेडकडून 60 मेगावॉट तात्पुरते 5.50 ते 5.70 रुपये प्रति युनिट दराने घेण्यास परवानगी दिली आहे. राज्यात सध्या 3,000 मेगावॅट ते 4,000 मेगावॅट विजेची तूट आहे.

कोस्टल गुजरात पॉवर लिमिटेडकडून वीज खरेदीसाठी महावितरणचा पुढील अडीच महिन्यांचा खर्च 100 कोटी ते 150 कोटी रुपये असणार आहे असे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितले. राज्याच्या तिजोरीवर कोणताही बोजा पडणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्य मंत्रिमंडळाने महावितरणला वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी आणि लोडशेडिंग टाळण्यासाठी वीज खरेदीचे इतर पर्याय पाहण्याचे निर्देश दिले आहेत.

इथे क्लिक करून वेळापत्रक पाहा

सविस्तर वेळापत्रक पहा

महाराष्ट्रात अनेक दिवसांपासून वीजेचे संकंट घोंघावत आहे. ग्रामीण भागात शेतकऱ्यांची वीज कापली जात आहे. लाईट बील (Light Bill) भरा असे आवाहन राज्य सरकारकडून (State Government) करण्यात येत आहे. देशात सध्या कोळशाची कमतरता आहे. त्यामुळे वीजनिर्मीतीला अडथळा येत आहे. उन्हाळा लवकर सुरू झाल्यामुळे विजेच्या मागणीत वाढ होत असताना, गुजरात आणि आंध्र प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्राला लवकरच ब्लॅकआउट किंवा लोडशेडिंगचा सामना करावा लागू शकतो. म्हणून आता महावितरणने (mahavitaran) लोडशेडिंगचे वेळापत्रक जारी केले आहे

mahavitaran time table maharashtra
Share via
Copy link