Maize Farming: Start sowing maize in Kharif Sow maize in such a manner and earn buckwheat
[ad_1]

Maize Farming: मका लागवड (corn cultivation) ही संपूर्ण देशात केली जाते. देशातील शेतकरी बांधव खरीप हंगामात (Kharif Season) मक्याची (Maize Crop) मोठ्या प्रमाणात शेती करत असतात. आपल्या राज्यातही मका लागवड लक्षणीय आहे. मका सर्वाधिक पोल्ट्री उद्योगात पोल्ट्री खाद्य म्हणून उपयोगात आणला जात असल्याने याला मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे.
यावर्षी मक्याला हमीभावापेक्षा अधिक दर मिळाल्याने मका उत्पादक शेतकऱ्यांना याचा फायदा झाला. खरं पाहता देशातील अनेक भागात मक्याची तिन्ही हंगामात शेती (Farming) केली जाते. मात्र खरीप हंगामात मक्याची पेरणी केल्यास त्यापासून चांगला नफा शेतकऱ्यांना (Farmer) मिळत असतो यामुळे खरीप हंगामात मक्याची मोठ्या प्रमाणात पेरणी केली जाते. आज आपण मक्याची शास्त्रीय पद्धतीने लागवड कशा पद्धतीने केली जाते याविषयी जाणून घेणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या विषयी सविस्तर.
मका पेरणीसाठी जमिनीची पूर्वमशागत
»मित्रांनो जर आपणास मका पेरणी करायची असेल तर सर्व प्रथम, शेताची खोल नांगरणी करावी लागणार आहे. त्यानंतर फळी मारून शेत सपाटीकरण करावे लागणार आहे.
»शेवटच्या नांगरणीपूर्वी शेतात कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत टाकल्यास मक्याचे चांगले उत्पादन प्राप्त होणार आहे.
»मका पिकापासून चांगले उत्पादन घेण्यासाठी त्याचे सुधारित वाण निवडण्याचा सल्ला कृषी क्षेत्रातील जाणकार लोक देत असतात.
»मक्याच्या उच्च उत्पन्न देणाऱ्या संकरीत वाणांमध्ये गंगा-5, डेक्कन-101, गंगा सफेद-2, गंगा-11 आणि डेक्कन-103 यांचा समावेश होतो.
»शेतकर्यांना त्याच्या सामान्य कालावधीच्या वाणांमध्ये चंदन मका-1 आणि लवकर पक्व होणार्या जातींमध्ये चंदन मका-3 आणि चंदन पांढरा मका-2 बियांचा वापर करता येणार आहे.
मक्याची पेरणी कशी करणार
»मका पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करणे अतिशय महत्त्वाचे असते. यामुळे मक्याच्या उत्पादनात भरीव वाढ होते शिवाय पिकांवर किडे व रोग येण्याची शक्यता देखील कमी होते.
»मक्याच्या संकरित वाणांच्या पेरणीसाठी एक हेक्टर शेतात 12-15 कि.ग्रॅ. बियाणं वापराव लागणार आहे.
»मक्याच्या संमिश्र वाणांच्या पेरणीसाठी हेक्टरी 15-20 किलो बियाणे वापरावे.
»मक्याच्या चारा पिकासाठी म्हणजेच हिरवा चाऱ्यासाठी हेक्टरी 40-45 किलो पेरणी करावी.
»मक्याच्या लवकर पक्व होणाऱ्या जातींच्या पेरणीच्या वेळी रेषा 60 सेंमी अंतरावर ठेवाव्यात. आणि बियाणं 20 सें.मी. अंतरावर पेरा.
»उशिरा पक्व होणाऱ्या मक्याच्या जातींसाठी ओळींमधील अंतर 75 सें.मी. आणि बियाणं 25 सें.मी. अंतरावर पेरा
»पशुखाद्य पिकासाठी ओळीमधील अंतर 40 सें.मी. आणि 25 सें.मी.च्या अंतरावर बियाणं पेरणी करावी.
»चांगल्या उत्पादनासाठी मक्याची पेरणी पावसाळ्याच्या पहिल्या पावसानंतर करावी.
»पावसाळ्यात पाणी साचण्यापासून पीक वाचवण्यासाठी मका गोट घालून पेरावे. बियाणे 3 ते 5 सें.मी. च्या खोलीत पेरा
»पेरणीनंतर 15-20 दिवसांनी पिकामध्ये कोळपनीचे काम करावे.
मक्याची पेरणी खरीप हंगामात जून-जुलै दरम्यान केली जाते. या वेळी पावसाळ्यात पडणाऱ्या पावसामुळे जास्त सिंचनाची गरज नसते, पावसाच्या पाण्यातून पिकाला पुरेसा ओलावा मिळतो. मका पिकाची पेरणी झाली की जनावरांसाठी पौष्टिक चाऱ्याचीही व्यवस्था केली जाते, मात्र मका पिकातून चांगले उत्पन्न मिळवायचे असेल तर पेरणीपासून काढणीपर्यंतची सर्व कामे काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे.
[ad_2]
आम्ही कास्तकार.कॉम वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा. तसेच शेतीविषयक माहितीसाठीआम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करू शकता.