Millet Farming: खरीप हंगामात शेतकरी बनणार धनवान…! या बाजरीच्या वाणाची पेरणी करा अन कमवा लाखों; कसं ते वाचा
[ad_1]

Millet Farming: राज्यात सर्वत्र पावसाने (Rain) जोरदार हजेरी लावली आहे. अशा परिस्थितीत राज्यातील शेतकरी बांधव (Farmer) आता खरीप हंगामाकडे (Kharif Season) वळला आहे. शेतकरी बांधव खरीप हंगामातील पिकांची (Kharif Crop) पेरणीसाठी आता लगबग करत असल्याचे चित्र राज्यात बघायला मिळत आहे. शेतकऱ्यांनी खरीप पिकांच्या पेरणीला आता मोठ्या प्रमाणात सुरुवात केली आहे.
मित्रांनो जस की आपणास ठाऊक आहे बाजरी हे एक खरीप हंगामातील महत्वाचे पीक (Bajra Crop) आहे. सध्या बाजरी गव्हापेक्षा देखील महाग विकली जात आहे. अशा परिस्थितीत आजच्या काळात अधिक नफा मिळविण्यासाठी शेतकरी बाजरी लागवडीला विशेष प्राधान्य देत असल्याचे सांगितले जात आहे. मित्रांनो गव्हाच्या पिठापासून बनवलेली चपाती सगळ्यांनाच आवडते.
मात्र गव्हाच्या रोटीपेक्षा बाजरीची भाकरी अधिक फायदेशीर असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे बाजरीच्या मागणीत दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत आहे. पूर्वी बाजरीची भाकरी केवळ ग्रामीण भागात बघायला मिळत असत मात्र अलीकडे बाजरी मध्ये असलेले पोषक गुणधर्म ओळखता याची मागणी शहरी भागात देखील वाढली आहे. अशा परिस्थितीत बाजरीची शेती शेतकऱ्यांसाठी विशेष फायद्याची ठरू शकते. चला तर मग जाणून घेऊया बाजरीच्या लागवडीविषयी काही महत्वाच्या बाबी.
खरीप बाजरी लागवड कशी करणार बर?
मित्रांनो कृषी तज्ञ खरीप हंगाम हा बाजरी लागवड करण्यास सर्वात योग्य हंगाम असल्याचे सांगत असतात. यामुळे खरीप हंगामात बाजरी पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी उन्हाळ्यात शेताची चांगली नांगरणी करून त्यातील तण काढून टाकावे. लक्षात ठेवा की, शेतकऱ्यांनी पहिल्या नांगरणीमध्येच प्रति हेक्टर 2 ते 3 टन शेणखत जमिनीत चांगले मिसळावे.
चांगले उत्पादन मिळविण्यासाठी शेताची नांगरणी पल्टी नांगराने करावी. त्यानंतर शेतात बाजरी पेरणीची प्रक्रिया सुरू करावी. तज्ञांच्या मते बाजरीच्या सुधारित वाणांची पेरणी केल्यास शेतकरी बांधवांना उत्पादन प्राप्त होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भरीव वाढ होते.
शेतकरी बांधवाना ज्या जमिनीत बाजरीची पेरणी करायची असेल त्या जमिनीत वाळवी आढळल्यास शेतकरी बांधवांनी कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्याने फॉस्फरस जमिनीत टाकावे. कृषी तज्ञांच्या मते, उत्तर भारतात बाजरीची लागवड करण्यासाठी जुलैचा महिना सर्वोत्तम मानला गेला आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात पेरणी केल्यास शेतकरी बांधवांना बाजरीच्या पिकातून चांगले दर्जेदार उत्पादन प्राप्त होऊ शकते.
बाजरी पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी हेक्टरी 5 किलो बाजरीच सुधारित बियाणे पेरणीसाठी वापरावे तसेच बियाणे पेरणीचे अंतर 40 ते 50 सें.मी. ठेवावे यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होते. बाजरीच्या बियाण एका ओळीत पेरावे. चांगले उत्पादन मिळविण्यासाठी, वेळोवेळी रोपांची पुनर्लावणी करावी लागणार आहे. 1 हेक्टर क्षेत्रात रोपे लावण्यासाठी सुमारे 500 चौरस मीटर क्षेत्रात 2-3 किलो बियाणे (Bajra Variety) पेरावे.
बाजरी लागवडीसाठी सुधारित वाण
I. C. M. B 155
W.CC 75
आयसी टीबी 8203
राज – 171
पुसा – 322
पुसा 23
IC M H. 441
बायर-9444 हायब्रिड बाजरी
पायोनियर बाजरी बियाणे 86M 88
[ad_2]
आम्ही कास्तकार.कॉम वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा. तसेच शेतीविषयक माहितीसाठीआम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करू शकता.