या १६ हजार ५७७ शेतकऱ्यांना प्रत्येकी ५० हजार रुपये अनुदान – कर्जमाफी योजना २०२०

महात्मा ज्योतीबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत ज्या शेतक-यांचे थकीत कर्ज देान लाखाच्या वरील आहे त्या शेतक-यांना अदयापही कर्जमुक्तीचा लाभ झालेला नाही.

असे कोपरगाव तालुक्यात सुमारे २७५ शेतकरी आहेत तर नियमीत कर्जाची परत फेड करणारे १६ हजार ५७७ शेतकरी असुन त्यांना महाविकास आघाडी शासनाने प्रत्येकी ५० हजार रूपये देण्याची घोषणा केली असुन ही रक्कम तात्काळ शेतक-यांच्या खाती जमा करावी, अशी मागणी अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक विवेकभैया कोल्हे यांनी केली.

हे पण वाचा : मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांविषयी जाणून घ्या अफलातून गोष्टी

अहमदनगर जिल्हा बॅकेअंतर्गत तालुक्यात महात्मा ज्योतीबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतकरी २७५ असुन त्यांना सुमारे ७ कोटी ६१ लाख ९६ हजार रूपये तर नियमीत कर्ज परतफेड करणारे १६ हजार ५७७ शेतकरी असुन त्यांना १०८ कोटी ५६ लाख रूपये मिळणार आहेत त्याबाबतचे प्रस्ताव दाखल करण्यात आलेले आहे.

हे पण वाचा : गुड न्यूज! आता व्हॉट्सॲपवर दिसणार इंस्टाग्रामच्या रिल्स; जाणून घ्‍या अधिक!

मागील हंगामात शेतक-यांना अतिवृष्टीचा फटका बसला त्यामुळे त्यांच्या हातुन खरीपाचे पीक वाया गेले तर रब्बी हंगामाची पीके उभी करतांना त्यांना पैशाची जमवाजमव करतांना कष्ट पडले, त्यात कोरोनाचे संकट पुन्हा उभे राहिले आहे. रब्बी पीक काढणीला आले आहे त्याचा खर्चही मोठा आहे.

अशा परिस्थितीत शेतक-यांच्या खात्यावर ही रक्कम तात्काळ जमा करून शासनाने जिल्हयातील सर्व शेतक-यांना दिलासा दयावा, असेही श्री कोल्हे यांनी म्हटले आहे.

1 thought on “या १६ हजार ५७७ शेतकऱ्यांना प्रत्येकी ५० हजार रुपये अनुदान – कर्जमाफी योजना २०२०”

  1. Pingback: पावसाचा अंदाज : येत्या गुरुवार पर्यंत अवकाळी पाऊस होण्याची शक्यता – Weather Update

Leave a Comment

X