Monsoon 2021 : वाचा कसा असेल यंदाचा मान्सून? दिलासादायक बातमी ! दुष्काळाची कोणतीही शक्यता नाही !

जूनपासून सुरू होणारा नैऋत्य मॉन्सून 2021 (Monsoon in 2021) मध्ये दीर्घ-कालावधी सरासरीच्या (LPA) 103 टक्के सामान्य राहण्याची शक्यता आहे. यंदा दुष्काळाची (Drought) शक्यता नसल्याचंही स्पष्ट झालं आहे.

Monsoon 2021 साठीचा स्कायमेट या खाजगी हवामान संस्थेचा हवामान अंदाज

मुंबई 13 एप्रिल : स्कायमेट (Skymet) या खासगी हवामान अंदाज संस्थेने मंगळवारी सांगितले की जूनपासून सुरू होणारा नैऋत्य मॉन्सून 2021 (Monsoon in 2021) मध्ये दीर्घ-कालावधी सरासरीच्या (LPA) 103 टक्के सामान्य राहण्याची शक्यता आहे. यंदा दुष्काळाची शक्यता नसल्याचंही या संस्थेनं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बातमी आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत एलपीएचा (LPA for June to September rainfall) अंदाज 880.6 मिमी इतका आहे. हा अंदाज खरा ठरल्यास देशात प्रत्यक्षात 907 मिलिमीटर पाऊस राहील.

Monsoon 2021
Monsoon 2021

Monsoon 2021 Weather Alert: राज्यावर अवकाळीचं सावट; ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याचा इशारा

स्कायमेटनं जाहीर केलेल्या सुरुवातीच्या अंदाजानुसार देशभरात खरंच इतक्याच प्रमाणात पाऊस पडल्यास, पावसाळ्याच्या महिन्यांत सलग तिसर्‍या वर्षी भारतामध्ये सामान्य ते साधारण पाऊस पडेल. 2020 मध्ये देशात एलपीएच्या 109 टक्के पाऊस होता तर 2019 मध्ये हा आकडा 110 टक्के इतका होता. एलपीएच्या 96-104 टक्के पाऊस म्हणजेच साधारण समजला जातो. स्कायमेटने दिलेल्या माहितीनुसार, गेल्यावेळी भारतात 1996 ते 1998 दरम्यान सलग तीन वर्षे सामान्य पावसाळा होता.

स्कायमेटनं असंही म्हटलं आहे, की देशात सरासरी किंवा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता 85 टक्के आहे. तर, सरासरीपेक्षा कमी किंवा व्यापक दुष्काळाची शक्यता 2021 मध्ये नाही. त्यामुळे, बळीराज्यासाठी नक्कीच ही दिलासादायक बातमी आहे. जून ते सप्टेंबर महिन्यांत पूर्व आणि मध्य भारतात सामान्य पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर उत्तर व उत्तर-पश्चिम भारतात पाऊस सरासरीपेक्षा कमी होण्याची शक्यता आहे, असंही स्कायमेटनं म्हटलं आहे.

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा. ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.

Leave a Comment

X