Monsoon 2022: मॉन्सूनच्या वाटचालीस राज्यात पोषक हवामान, पण सध्या मान्सून नेमका आहे तरी कुठे? बघा - Amhi Kastkar

Monsoon 2022: मॉन्सूनच्या वाटचालीस राज्यात पोषक हवामान, पण सध्या मान्सून नेमका आहे तरी कुठे? बघा

Rate this post

Maharashtra Weather : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) नंदूरबार, जळगाव, परभणीपर्यंतच्या भागात प्रगती केली आहे. मंगळवारी (ता. १४) मॉन्सूनच्या वाटचालीची सीमा कायम होती. वाटचालीस पोषक हवामान आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत मॉन्सून संपूर्ण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व्यापून विदर्भाच्या काही भागात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

यंदा नियमित सर्वसाधारण वेळेच्या तीन दिवस उशिराने (१० जून) कोकणात पोचलेला मॉन्सून ११ जून रोजी बहुतांशी कोकण, मध्य महाराष्ट्राचा दक्षिण भागात डेरेदाखल झाला. तर सोमवारी (ता. १३) मॉन्सूनने संपूर्ण कोकणसह, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या बहुतांश भागापर्यंत टप्पा गाठला.

निम्म्या महाराष्ट्रासह, दक्षिण गुजरात, कर्नाटकचा बहुतांश भाग, तेलंगाणा, रायलसीमाचा काही भाग आणि तमिळनाडूच्या आणखी काही भागातही मॉन्सूनने चाल केल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले.

शुक्रवारपर्यंत (ता. १७) गुजरातच्या आणखी काही भाग, संपूर्ण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कर्नाटक, तामिळनाडूसह विदर्भाच्या काही भागात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे. तर आंध्र प्रदेश, तेलंगणा, पश्चिम बंगालच्या आणखी काही भागासह झारखंड, ओडिशा, बिहार काही भागातही मॉन्सून प्रगती करण्याचे संकेतही हवामान विभागाने दिले आहेत.

हे पण वाचा:

नावआम्ही कास्तकार हवामान अंदाज
विभागआम्ही कास्तकार
दिनांक15 जून 2022
संकलनआजचे हवामान महाराष्ट्र 2022

पंजाब डख हवामान अंदाज Whatsapp Group

मित्रांनो दररोज जिल्हानिहाय हवामान अंदाज मिळवण्यासाठी आणि त्याचबरोबर पंजाब डख हवामान अंदाज व हवामान विभागाचे अपडेट निशुल्क मिळवण्यासाठी इथे क्लिक करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा आणि हि माहिती जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद

मॉन्सूनच्या वाटचालीस राज्यात पोषक हवामान

Leave a Comment

Share via
Copy link