Monsoon Arrival in Vidarbha : विदर्भातील सर्वच जिल्ह्यात मान्सूनचे आगमन, गडचिरोलीसह चंद्रपूर यवतमाळमध्ये मुसळधार पावसाचा इशारा - Amhi Kastkar
Agriculture News in Marathi

Monsoon Arrival in Vidarbha : विदर्भातील सर्वच जिल्ह्यात मान्सूनचे आगमन, गडचिरोलीसह चंद्रपूर यवतमाळमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

0
5/5 - (3 votes)

Monsoon Arrival in Vidarbha : विदर्भातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यात मान्सूनचे आगमन झाले आहे. हवामान विभागाच्या नागपूर विभागीय कार्यालयानं याबाबतची माहिती जाहीर केली आहे. पुढील पाच दिवस विदर्भात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. गडचिरोली, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्याच्या काही भागात मात्र मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.

राज्यात मान्सून हळूहळू पुढे सरकत आहे. राज्याच्या विविध भागात चांगला पाऊस होताना दिसत आहे. मुंबई आणि परिसरात चांगलाच पाऊस झाला. तसेच राज्याच्या इतरही भागात पावसानं दरदार हजेरी लावली आहे. राज्यातील मुंबईसह पुणे, कोल्हापूर, सांगली यवतमाळ, हिंगोली, चंद्रपूर, गोंदिया या भागात पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तसेच शेतीकामांना वेग आला आहे.

मध्य प्रदेशसह विदर्भ आणि छत्तीसगडमध्ये वादळी पावसाचा इशारा

पुढच्या 5 दिवसांत मध्य प्रदेशसह विदर्भ आणि छत्तीसगडमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. विजांच्या कडकडाटासह हा पाऊस होणार असल्यानं नागरिकांना योग्य ती खबरदारी घ्यावी. छत्तीसगडमध्ये पुढील 5 दिवसांत मुसळधार पाऊस होणार आहे. 15 ते 17 जूनच्या दरम्यान पूर्व मध्य प्रदेशात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर 19 जून रोजी विदर्भात वादळी पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.

राज्याच्या विविध भागात पावसानं चांगलीच हेजरी लावली आहे. या पवासामुळं शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या पावसामुळं पेरणीपूर्व कामांना वेग आला आहे. राज्यातील शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत होते. अखेर पावसाचं आगमन झाल्यानं शेतकरी आनंदी आहेत.

दरम्यान, शेतकऱ्यांनी नेमकी पेरणी कधी करावी असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर कृषी विद्यापीठ आणि कृषी तज्ज्ञांनाकडून याबाबत सल्ला मिळाला आहे. 100 मिलीमीटर पाऊस पडेपर्यंत शेतकऱ्यांना पेरणीची घाई करु नये असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. दुबार पेरणीची अडचण टाळण्यासाठी कृषी तज्ज्ञांनी हा सल्ला दिला आहे.  

महत्वाच्या बातम्या:

weather
Share via
Copy link