Crop DamageHeavy RainIMD InformationIMD Monsoon forecastkharif seasonMonsoon rainअन्य जिल्हेकृषीमहाराष्ट्रराष्ट्रीय

Monsoon : उर्वरित काळात सरासरीएवढाच पाऊस, खरीप पिकांसाठी फायदा की नुकसान..! वाचा सविस्तर

ऑगस्ट महिना उजाडला म्हणजे आता मान्सूनचा दुसरा टप्पा सुरु झाला आहे. पहिल्या टप्प्याची सुरवात निराशाजनक राहिली असली तरी जुलैमध्ये रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाला आहे. त्यामुळे आगामी काळात असेच चित्र राहिले तर खरिपाचे नुकसान अटळ होते. पण आता हवामान विभागाने वर्तवलेला अंदाज सर्वांनाच दिलासा देणारा आहे. कारण उर्वरित काळात अतिवृष्टी, सततची ऱिमझिम असे चित्र नाही तर केवळ सरासरीच्या तुलनेत पाऊस राहणार असल्याचा अंदाज आहे.

ऑगस्ट महिना उजाडला म्हणजे आता मान्सूनचा दुसरा टप्पा सुरु झाला आहे. पहिल्या टप्प्याची सुरवात निराशाजनक राहिली असली तरी जुलैमध्ये रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाला आहे. त्यामुळे आगामी काळात असेच चित्र राहिले तर खरिपाचे नुकसान अटळ होते. पण आता हवामान विभागाने वर्तवलेला अंदाज सर्वांनाच दिलासा देणारा आहे. कारण उर्वरित काळात अतिवृष्टी, सततची ऱिमझिम असे चित्र नाही तर केवळ सरासरीच्या तुलनेत पाऊस राहणार असल्याचा अंदाज आहे

Monsoon : उर्वरित काळात सरासरीएवढाच पाऊस, खरीप पिकांसाठी फायदा की नुकसान..! वाचा सविस्तर

उर्वरित दोन महिने आता सरासरीएवढाच पाऊस बरसणार आहे.

मुंबई : दरवर्षी परतीच्या पावसाने चित्र बदलत असते. यंदा मात्र, हंगामाच्या सुरवातीलाच  (Monsoon)मान्सून असा काय बरसला आहे की पुढे आणखी काय होणार याची धास्ती प्रत्येकाच्या मनात आहे विशेषत: शेतकऱ्यांच्या. पावसामध्ये असेच सातत्य राहिले तर पिकांचे तर नुकसान होईलच पण आगामी रब्बीवरही टांगती तलवार राहिल अशी भिती व्यक्त केली जात आहे. मात्र, शेतकऱ्यांसह सर्वानांच दिलासा मिळेल असा अंदाज (Meteorological Department) हवामान विभागाने वर्तवला आहे. पावसाळ्याचे पहिले दोन महिने संपल्यात जमा आहेत. आता उर्वरित दोन महिन्यांमध्ये (Average rainfall) सरासरी एवढाच पाऊस पडेल असा अंदाज आहे. त्यामुळे दरवर्षी परतीचा होणारा पाऊस यंदा मात्र, जुलै महिन्यातच झाला काय असे चित्र आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये सरासरीच्या तुलनेत 94 ते 100 टक्के पाऊस पडेल असा अंदाज आहे.

पहिल्या टप्प्यात दणक्यात, आता दुसऱ्यामध्ये काय होणार?

ऑगस्ट महिना उजाडला म्हणजे आता मान्सूनचा दुसरा टप्पा सुरु झाला आहे. पहिल्या टप्प्याची सुरवात निराशाजनक राहिली असली तरी जुलैमध्ये रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाला आहे. त्यामुळे आगामी काळात असेच चित्र राहिले तर खरिपाचे नुकसान अटळ होते. पण आता हवामान विभागाने वर्तवलेला अंदाज सर्वांनाच दिलासा देणारा आहे. कारण उर्वरित काळात अतिवृष्टी, सततची ऱिमझिम असे चित्र नाही तर केवळ सरासरीच्या तुलनेत पाऊस राहणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे अंदाज जर खरा उतरला तर खरिपाची अपेक्षा कायम राहणार आहे.

जुलैमध्ये सरासरीच्या दुप्पट पाऊस

जूनमध्ये पावसाने उघडीप दिली होती. त्यामुळे खरिपाचे काय होणार असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, जूनच्या अंतिम टप्प्यात पेरण्या आणि 1 जुलैपासून सुरु झालेला पाऊस हा 20 जुलैपर्यंत कायम होता. या पावसाने केवळ सरासरीच ओलांडली नाहीतर पिकांचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. जुलैच्या 20 दिवसांमध्येच सरासरीच्या दुप्पट पाऊस झाला होता. याचा सर्वाधिक फटका खरिपातील पिकांना बसलेला आहे. आता कुठे पिकांची वाढ होऊ लागली आहे. पण शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणेही गरजेचे आहे.

खरिपाला मिळणार नवसंजीवनी

आगामी काळात जर अतिवृष्टी आणि पाऊस लागून राहिला नाहीतर खरिपातील पिकांची वाढ होणार आहे. शिवाय उत्पादनामध्येही फरक पडणार आहे. गतवर्षी पिके अंतिम टप्प्यात असतानाच अतिवृष्टी झाली होती. यामध्ये नुकसान तर झालेच पण शेतकऱ्यांची मेहनतही वाया गेली होती. यंदा उरर्वरित दोन महिन्यात सरासरी एढा पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button