monsoon update Five days of rain from today, heavy rain falling at this place, warning of the weather department - Amhi Kastkar
Agriculture News in Marathi

monsoon update Five days of rain from today, heavy rain falling at this place, warning of the weather department

0
Rate this post

[ad_1]

Monsoon Update: देशातील राज्यात अजूनही मान्सून (Monsoon) दाखल झालेला नाही. महाराष्ट्रात मात्र मान्सूनचे (Monsoon News) सर्वदूर आगमन झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे राज्यातील उकाड्याने हैराण झालेल्या जनतेस आणि बळीराजाला (Farmer) मोठा दिलासा मिळाला आहे. देशात जवळपास सर्वत्र मान्सून आणि मान्सूनपूर्व पावसाची (Pre Monsoon Rain) हजेरी बघायला मिळाली आहे. यामुळे नागरिकांना उष्णतेपासून मोठा दिलासा दिला आहे.

त्याचबरोबर दक्षिणेनंतर आता उत्तर भारतातील राज्यांमध्ये मान्सूनची एन्ट्री होणार आहे. गेल्या महिन्याच्या अखेरीस केरळमध्ये मान्सूनचे आगमन झाल्यानंतर मान्सून आता अनेक राज्यांत पोहोचला आहे. महाराष्ट्रात मान्सून 10 जून रोजी दाखल झाला. मात्र असे असले तरी, राज्यात बहुतांशी ठिकाणी जुनचा पहिला पंधरवाडा पावसाविना काढावा लागला. मात्र आता मान्सून पुन्हा एकदा राज्यात सक्रिय झाला असून राज्यात सर्वदूर मोसमी पावसाची दमदार हजेरी लागत आहे. तर, उत्तर भारतातील राज्यांमध्येही मान्सूनपूर्व पाऊस पडत आहे.

दरम्यान, लवकरच मान्सून देशाच्या इतर भागांत दाखल होईल, असा अंदाज आहे. हवामान विभागाच्या (IMD) मते, नैऋत्य मान्सून 23 जून ते 29 जून दरम्यान मध्य भारताच्या उर्वरित भागात आणि वायव्य भारताच्या अनेक भागात पोहोचण्याची शक्यता आहे. हवामान खात्याचे म्हणणे आहे की नैऋत्य मान्सून 27 जूनपर्यंत दिल्लीत पोहोचण्याची शक्यता आहे आणि जूनच्या अखेरीस चांगला पाऊस होईल.

हवामान खात्याच्या (Indian Meteorological Department) म्हणण्यानुसार मान्सून झारखंड, बिहार आणि आग्नेय उत्तर प्रदेशच्या काही भागाकडे सरकत आहे.  एमआयडीनुसार, येत्या पाच दिवसांत पश्चिम पट्ट्यात मुसळधार पाऊस पडू शकतो. याशिवाय उत्तर, मध्य आणि पूर्व भारताच्या राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

बिहारमधील बहुतांश जिल्ह्यांमध्ये सध्या पाऊस पडत आहे.  या जिल्ह्यांमध्ये येणारे सात दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. मात्र, वादळामुळे लोकांच्या अडचणी वाढू शकतात.

स्कायमेट हवामानानुसार, आज कोकण आणि गोवा, सिक्कीम, उप हिमालयीन पश्चिम बंगाल, किनारी कर्नाटक आणि लगतच्या भागात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. ईशान्य भारतात पाऊस कमी होईल आणि मुसळधार पाऊस मागे पडेल अशी अपेक्षा आहे.  देशाच्या उत्तरेकडील भागात आज हवामानातील काही हालचाल दिसू शकतात परंतु उद्यापासून खूप हलकी क्रिया दिसून येईल.

पुढील 24 तासांत मुंबई, दक्षिण गुजरात, पूर्व राजस्थान यासह पश्चिम आसाम, सिक्कीम, उप हिमालयीन पश्चिम बंगाल, केरळचा काही भाग, किनारी कर्नाटक, कोकण आणि गोव्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.  तसेच दक्षिण ओडिशा, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशच्या काही भागात पावसाची शक्यता आहे.

[ad_2]

आम्ही कास्तकार.कॉम वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा. तसेच शेतीविषयक माहितीसाठीआम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करू शकता.

Share via
Copy link