Monsoon Update – माॅन्सूनने जवळपास निम्मा महाराष्ट्र व्यापला, इतक्या दिवसात सर्वत्र बसणार; हवामान अंदाज महाराष्ट्र 2022
पुणे : महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा (मॉन्सून) पुढील प्रवास वेगाने सुरू आहे. मॉन्सूनने आज (ता.१३) जवळपास निम्मा महाराष्ट्र व्यापला असून, नंदूरबार, जळगाव, परभणी पर्यंतच्या भागात मजल मारली आहे. बुधवारपर्यंत (ता. १५) मॉन्सून विदर्भाच्या काही भागात दाखल होण्याची शक्यताही हवामान विभागाने (IMD)वर्तविली आहे.
गोव्याच्या उंबरठ्यापर्यंत पोचल्यानंतर महाराष्ट्रात दाखल होण्यासाठी तब्बल दहा दिवस वाट पहायला लावल्याने चिंतेचे वातावरण तयार झाले होते. १० जून रोजी कोकणात प्रवेश करणारा मॉन्सून ११ जून रोजी बहुतांशी कोकण, मध्य महाराष्ट्राचा दक्षिण भागात डेरेदाखल झाला.
तर दि.१३ जून २०२२ ला मॉन्सूनने संपूर्ण कोकणसह, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या बहुतांश भागापर्यंत टप्पा गाठला आहे. निम्म्या महाराष्ट्रासह, दक्षिण गुजरात, कर्नाटकचा बहुतांश भाग, तेलंगाणा, रायलसीमाचा काही भाग आणि तामिळनाडूच्या आणखी काही भागातही मॉन्सूनने चाल केली केल्याचे हवामान विभागाने (IMD) स्पष्ट केले.
हे पण वाचा:
- Monsoon arrival : खुशखबर! अखेर मान्सून केरळमध्ये दाखल, हवामान विभागाची माहिती
- पंजाब डख नवीन हवामान अंदाज – राज्यात या तारखेपासून पावसाची हजेरी । Panjab Dakh Weather Alert
- Mansoon 2022: मोठी बातमी! मान्सूनची तारीख बदलली; आता ‘या’ दिवशी होणार आगमन । आजचा हवामानाचा अंदाज
- Monsoon 2022: हवामान विभागाचा अंदाज चुकणार? मान्सूनचा खोळंबा; पावसाला विलंब
- आला रे मान्सून आला… ‘या’ तारखेला महाराष्ट्रात दाखल होणार मान्सून! । Maharashtra monsoon weather
नाव | आम्ही कास्तकार हवामान अंदाज |
---|---|
विभाग | आम्ही कास्तकार |
दिनांक | 15 जून 2022 |
संकलन | आजचे हवामान महाराष्ट्र 2022 |
पंजाब डख हवामान अंदाज Whatsapp Group
मित्रांनो दररोज जिल्हानिहाय हवामान अंदाज मिळवण्यासाठी आणि त्याचबरोबर पंजाब डख हवामान अंदाज व हवामान विभागाचे अपडेट निशुल्क मिळवण्यासाठी इथे क्लिक करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा आणि हि माहिती जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद