Monsoon Update: पंजाबरावांचा 20 जुलैपर्यंतचा अंदाज आला…! राज्यात पावसाची बॅटिंग कायम; फक्त ‘हे’ तीन दिवस सूर्यदर्शन होणारं - Amhi Kastkar
Agriculture News in Marathi

Monsoon Update: पंजाबरावांचा 20 जुलैपर्यंतचा अंदाज आला…! राज्यात पावसाची बॅटिंग कायम; फक्त ‘हे’ तीन दिवस सूर्यदर्शन होणारं

0
5/5 - (1 vote)

Monsoon Update: राज्यात गेल्या काही दिवसापासून पावसाची (Rain) दमदार बॅटिंग सुरू आहे. राज्यातील अनेक भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र आहे. कोकण किनारपट्टी, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ मध्ये अनेक ठिकाणी अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस (Monsoon) कोसळत आहे.

यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांची नासाडी झाली आहे. शिवाय यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार,जळगाव शिवाय नाशिक जिल्ह्यातील अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसामुळे (Monsoon News) धरणांची पातळी लक्षनीय वाढली आहे.

नाशिक जिल्ह्यातील हरणबारी, गिरणा, पुंनद, चनकापूर इत्यादी धरण ओसंडून वाहत असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे राज्यातील शेतकरी बांधव तसेच सामान्य जनता पाऊस उघडण्याची मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहे.

पावसाअभावी पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या बळीराजाला, आता रोजच पाऊस कोसळत असल्याने पाऊस उघडण्याची वाट पाहावी लागत आहे. शेतकऱ्यांच्या मते, सध्या सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पेरलेले पिकं सडत आहेत. निश्चितच शेतकऱ्यांचा डोळ्यासमोर पिकांची नासाडी या जोरदार पावसामुळे होत आहे.

दरम्यान आपल्या हवामान अंदाजासाठी संपूर्ण महाराष्ट्रात एक वेगळी ओळख निर्माण केलेल्या पंजाबराव डख साहेबांचा नवीन सुधारित मान्सून अंदाज (Panjabrao Dakh Havaman Andaz) आता जाहीर करण्यात आला आहे.

पंजाबराव यांनी वर्तवलेल्या सुधारित अंदाजानुसार (Panjab Dakh Weather Report), आज 14 जुलै रोजी राज्यात मुसळधार ते अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस कोसळणार आहे. मात्र उद्या 15 जुलै पासून तीन दिवस राज्यात पावसाचा जोर कमी होणार असून पंधरा तारखेला सूर्याचे दर्शन होणार आहे.

15 जुलै ते 17 जुलै या कालावधीत सूर्याचं दर्शन महाराष्ट्राला घडणार आहे. निश्चितच उद्यापासून तीन दिवस पावसाचा जोर कमी होणार आहे. मात्र असे असले तरी पंजाबरावांनी (Panjabrao Dakh News) वर्तवलेल्या अंदाजानुसार, 18 जुलै पासून पुन्हा एकदा मोसमी पावसाचा जोर वाढणार आहे.

18 जुलै ते 20 जुलै या काळात पुन्हा राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. यामुळे निश्चितच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांची नासाडी होणार आहे.

यामुळे पंजाबरावं डख (Panjabrao Dakh) यांनी शेतकरी बांधवांना पिकाचा विमा काढण्याचा सल्ला यावेळी दिला आहे. निश्चितच राज्यात मध्यंतरी काही काळ शांत झालेला मान्सून आता शेतकऱ्यांसाठी त्रासदायक सिद्ध होत आहे.

आम्ही कास्तकार.कॉम वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा. तसेच शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करू शकता.

Share via
Copy link