Monsoon Update: पंजाबराव डख यांचा 15 जुलैपर्यंतचा मान्सून अंदाज आला…! राज्यात "इथे" अतिवृष्टीची शक्यता - Amhi Kastkar
Agriculture News in Marathi

Monsoon Update: पंजाबराव डख यांचा 15 जुलैपर्यंतचा मान्सून अंदाज आला…! राज्यात “इथे” अतिवृष्टीची शक्यता

0
4.7/5 - (3 votes)

Monsoon Update: राज्यात सध्या सर्वत्र शेतकरी बांधव पेरणीची कामे करण्यात व्यस्त आहेत. राज्यातील अनेक भागात पेरणीची कामे आटपली देखील आहेत. मात्र असे असले तरी अद्यापही काही भागात पेरणीची कामे राहिलेले आहेत. तर काही भागातील शेतकरी बांधव पेरणी झाली असून पिकांच्या जोमाने वाढीसाठी पावसाची (Rain) आतुरतेने वाट पाहत आहेत.

यामुळे शेतकऱ्यांचे डोळे पुन्हा एकदा आभाळाकडे लागले आहेत. दरम्यान राज्यातील काही भागात मोसमी (Monsoon) पावसाची हजेरी बघायला मिळत आहे. राजधानी मुंबई तसेच कोकणातील अनेक जिल्ह्यात गेल्या काही दिवसात मुसळधार पावसाची (Monsoon News) हजेरी बघायला मिळाली. पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाची भाग बदलत हजेरी बघायला मिळत आहे.

असे असतानाच आपल्या हवामान अंदाजासाठी संपूर्ण महाराष्ट्रात आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारे परभणी भूमिपुत्र पंजाबराव डख यांचा नवीनतम मान्सून अंदाज (Panjabrao Dakh Havaman Andaz) आता जाहीर करण्यात आला आहे. पंजाबराव (Panjabrao Dakh) यांनी आता 15 जुलै पर्यंतचा आपला मान्सून अंदाज व्यक्त केला आहे. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया पंजाबराव डख यांचा 15 जुलै पर्यंतचा मान्सून अंदाज (Panjab Dakh Weather Report).

पंजाबरावांचा 15 जुलै पर्यंतचा मान्सून अंदाज

पंजाबराव (Panjabrao Dakh News) यांनी वर्तवलेल्या सुधारित अंदाजानुसार, शेतकरी बांधवांनी आज शेतीशी निगडीत सर्व कामे करून घ्यावेत. शेतकरी बांधवांना कोळपणी फवारणी इत्यादी काही कामे असतील ती आजच्या दिवशी करण्याचे आवाहन डख यांनी केले आहे. पंजाबराव यांच्या मते, उद्या अर्थात पाच तारखेपासून राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस बघायला मिळणार आहे.

पाच तारखेपासून ते 15 जुलै पर्यंत राज्यात सर्वत्र मोसमी पावसाची हजेरी राहणार आहे. या कालावधीत राज्यातील अनेक भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता देखील पंजाबराव यांनी वर्तवली आहे. एकंदरीत पाच तारखेपासून राज्यात मोसमी पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढणार आहे. या कालावधीत राहिलेल्या शेतकऱ्यांची पेरणी होणार असल्याचा दावा पंजाबराव यांनी केला आहे.

पंजाबराव यांच्या मते 5 जुलै ते 15 जुलै या दरम्यान राज्यात सर्वत्र पाऊस असेल. मात्र पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा तसेच उत्तर महाराष्ट्र या विभागात पावसाची सर्वाधिक हजेरी राहणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील नंदूरबार जळगाव धुळे आणि नाशिक या जिल्ह्यात मोसमी पावसाचा जोर अधिक राहणार आहे.

आम्ही कास्तकार.कॉम वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा. तसेच शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करू शकता.

Panjabrao Dakh havaman Andaj Today Live
Share via
Copy link