Mushroom Farming Business | 12वी फेल झालेल्या पट्ठ्याने मशरूम शेतीतून वर्षाकाठी मिळवला तब्बल 35 ते 40 लाखांचा नफा ! - Amhi Kastkar
Agriculture News in Marathi

Mushroom Farming Business | 12वी फेल झालेल्या पट्ठ्याने मशरूम शेतीतून वर्षाकाठी मिळवला तब्बल 35 ते 40 लाखांचा नफा !

0
5/5 - (6 votes)

Mushroom Farming Business | भारतातील शेतकरी जागरूक होत आहेत. पारंपारिक पिकांशिवाय नवीन पिकांच्या माध्यमातून तो नफा कमवत आहे. तरुण वर्गही मोठ्या प्रमाणात शेतीकडे वळत आहे.

या शेतीशी निगडित असलेला हरियाणातील हिस्सार जिल्ह्यातील सालेमगढ गावात राहणारा 24 वर्षीय विकास वर्मा 45×130 फूट आकाराच्या चार फर्ममध्ये मशरूमची लागवड करून वर्षाला तब्बल 30 ते 40 लाखांचा नफा मिळवत आहे.केंद्र आणि राज्य सरकारकडून मशरूम लागवडीलाही प्रोत्साहन दिलं जात असून अनुदान देण्यात येत आहे.

विकास वर्माने सांगितलं की, 2016 मध्ये जेव्हा तो 12वी नापास झाला तेव्हा त्याला पुन्हा शाळा शिकण्याची इच्छा नव्हती. कुटुंबातील लोक पूर्वीपासूनच शेती करायचे, त्यामुळे त्याला त्याच्याशी संबंधित लहान-मोठे बारकावे माहीत होते. भविष्याची चिंता न करता तो शेतीत उतरला. वयाच्या 24 व्या वर्षी मशरूम उत्पादनासोबतच त्याने “वेदांत मशरूम” नावाची एक कृषी कंपनी निर्माण केली अन् आज त्या कंपनीची उलाढाल वर्षाला तब्बल 70 लाखांच्या आसपास पोहोचली आहे.

विकासासाठी मशरूम लागवडीची सुरुवात इतकी सोपी नव्हती. त्यांच्या म्हणण्यानुसार, या काळात त्यांच्यासमोर अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. त्यांचे कुटुंब पारंपरिक पद्धतीने शेती करायचे. या शेतीत त्यांचे खूप हाल झाले. त्याने घरी ‘मशरूम लागवडी’बद्दल सर्वांना सांगितले, तेव्हा सर्वांनी पाठिंबा दिला. यामध्ये त्याने आपल्या साथीदाराला मित्र बनवले होते.

अगदी कमी माहितीत मशरूमची लागवड सुरू केली. अशा स्थितीत त्यांचे सुमारे 15 लाखांचे नुकसान झाले. त्याचा साथीदारा नेही त्याची साथ सोडली, पण हार मानेन तो शेतकरी कसला ? विकासनेही हार न मानता कुटुंबीयांच्या पाठिंब्याने मशरूमची लागवड सुरू ठेवली आणि आज त्यांना जवळपास 35 ते 40 लाखांचा नफा मिळत आहे.

विकासचं म्हणणं आहे की, जेव्हा तो सोनीपतला गेला होता तेव्हा पहिल्यांदा त्याला शेतीची माहिती मिळाली. तेथे त्याने शेतकऱ्यांना शेती करताना पाहिले. बटन मशरूमपासून सुरुवात केली, पण त्यांना विक्रीसाठी बाजारपेठ मिळत नव्हती, त्यामुळे त्यांचे खूप नुकसान होत होते. मग त्याने मशरूमला सुकवून विकण्याचा प्रयत्न केला आणि ते विकण्यातही त्याला यश आले नाही. कंपोस्ट तयार करतानाही त्याने अनेक चुका केल्या. त्यामुळे त्याला खूप त्रास सहन करावा लागला.

तुम्ही हे जाणून घ्या की, बटन मशरूमचे सेल्फ लाइफ फक्त 48 तास असते. त्या वेळी मशरूमची विक्री झाली नाही, तर शेतकऱ्यांना मोठा फटका सहन करावा लागतो. याबाबत त्यांनी कृषी तज्ज्ञांशी चर्चा केली. तेथे त्यांना ‘ऑयस्टर मशरूम’चे उत्पादन करण्याचा सल्ला देण्यात आला. या मशरूमची खास गोष्ट म्हणजे ते उन्हाळ्यातही पिकवता येते. यासाठी एसी रूमची गरज नाही. एवढं करूनही त्याला मशरूम विकायला मार्केट मिळालं नाही !

विकासने सांगितलं की, याला सामोरे जाण्यासाठी त्यांनी मशरूमवर प्रक्रिया करून बिस्किटे, पेय आणि चिप्स सारखे पदार्थ बनवण्यास सुरुवात केली. अन् या प्रक्रियेमुळे बाजारात विकणेही सोपे झाले आहे. जे मशरूम ते 700 रुपये किलोने विकायचे, आता त्याच एक किलो मशरूमवर प्रक्रिया केल्यावर सुमारे 8000 रुपये मिळतात. यामध्ये विकासाला 6000 हजारांपर्यंत नफा मिळायला लागला.

यासोबतच तो महिलांना मशरूमवर प्रक्रिया करून प्रॉडक्शन बनवण्याचे प्रशिक्षणही देत ​​आहे. याचा लाभ तर मिळत आहेच शिवाय महिलांना रोजगाराच्या संधीही मिळत आहेत.

विकास सध्या मशरूम उत्पादनातून 30 लोकांना रोजगार देत आहे. याशिवाय त्यांनी आजूबाजूच्या 10 हजार लोकांना त्याच्या लागवडीचे प्रशिक्षण दिले आहे. मशरूम उत्पादन क्षेत्रात केंद्र आणि राज्य सरकारचे अनेक पुरस्कार विकासला मिळाले आहेत.

Mashroom Farming
Share via
Copy link