भले शाब्बास पोरी…! शेतकऱ्याच्या पोरीचा लॉस एंजिलीसमध्ये विक्रम! 9 मिनटात 3 हजार मीटर धावत नॅशनल रेकॉर्ड केलं नावावर - Amhi Kastkar
Agriculture News in Marathi

भले शाब्बास पोरी…! शेतकऱ्याच्या पोरीचा लॉस एंजिलीसमध्ये विक्रम! 9 मिनटात 3 हजार मीटर धावत नॅशनल रेकॉर्ड केलं नावावर

0
Rate this post

Success Story: उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) मेरठमधील एका सामान्य शेतकरी कुटुंबातील (Farmer) पारुल चौधरी हिने लॉस एंजेलिसमधील साऊंड रनिंग मीटमध्ये राष्ट्रीय विक्रम केला आहे. पारुल चौधरी महिलांच्या 3000 मीटर स्पर्धेत 9 मिनिटांपेक्षा कमी वेळ घेणारी देशातील पहिली अॅथलीट ठरली आहे.

शेतकऱ्याच्या पोरीने (Farmer Daughter) केलेला हा विक्रम निश्चितच भारतीयांसाठी अभिमानास्पद आहे. पारुलने शनिवारी रात्री साऊंड रनिंग मीटमध्ये तिसरा क्रमांक पटकावला. तीने 3000 मीटरची शर्यत 8 मिनिटे 57.19 सेकंदात पूर्ण केली.

पारुलने (Parul Chaudhari) सहा वर्षांपूर्वी दिल्लीत सूर्या लोंगनाथनचा 9 मिनिटे 4.5 सेकंदाचा विक्रमही मोडीत काढला होता. पारुल चौधरी ही देशात स्टीपलचेसमध्ये देखील तज्ञ मानली जाते.

पारुल चौधरी या एकलौता गावातील आहेत

देशाच्या राजधानीपासून सुमारे 70 किमी अंतरावर असलेल्या मेरठच्या (Merath) दौराला भागातील एकलौता गावातील रहिवासी पारुल चौधरीच्या या यशाने संपूर्ण गाव आनंदी असल्याचे बघायला मिळत आहे.

अतिशय सामान्य शेतकरी कुटुंबातील पारुल हिने देशाचे नाव उंचावले आहे. लॉस एंजेलिसमध्ये एका शेतकऱ्याच्या मुलीने 3000 मीटरमध्ये राष्ट्रीय विक्रम केला. हे जाणून गावात मिठाई वाटण्यात येत आहे.

पारुल चौधरीची दमदार कामगिरी

पारुल चौधरी शर्यतीत पाचव्या स्थानावर होती पण शेवटच्या दोन लॅप्समध्ये दमदार कामगिरी करत तिला व्यासपीठावर पोहोचवण्यात यश मिळालं. येथे त्याने तिसरे स्थान पटकावले.  3000 मीटर ही एक बिगर ऑलिम्पिक स्पर्धा आहे. ज्यामध्ये भारतीय खेळाडू बहुतेक स्पर्धा करत नाहीत. या महिन्यात 15 जुलैपासून अमेरिकेतील ओरेगॉन येथे होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पारुल देशाचे प्रतिनिधित्व करणार आहे.

क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी अभिनंदन केले

पारुल चौधरीच्या उत्कृष्ट विक्रमावर क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी ट्विटद्वारे या होतकरू खेळाडूचे अभिनंदन केले आहे.  गेल्या पंधरवड्यात कोलोरॅडो स्प्रिंग्स येथे प्रशिक्षण घेतलेल्या पारुल चौधरीने 24 एप्रिल 2016 रोजी नवी दिल्ली येथे इंडियन ग्रांप्री 1 मध्ये लोगनाथन सूर्याचा 9:04.5 विक्रम मोडला आहे.

आम्ही कास्तकार.कॉम वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा. तसेच शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करू शकता.

National Record of Running 3 Thousand Meter in 9 Minutes
Share via
Copy link