आज पेट्रोलपंप चालकांचा देशव्यापी संप! पेट्रोलपंप बंद राहणार की चालू? - Amhi Kastkar
Agriculture News in Marathi

आज पेट्रोलपंप चालकांचा देशव्यापी संप! पेट्रोलपंप बंद राहणार की चालू?

0
4.7/5 - (3 votes)

सरकारचे पेट्रोल डीलर्सच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डीलर्स असोसिएशन 31 मे रोजी देशव्यापी खरेदी बंद आंदोलन करणार आहे. तसेच आज ऑल इंडिया पेट्रोल पंप असोसिएशन (All India Petrol Pump Association) केंद्र सरकारचा निषेध नोंदवणार आहे.

आज ऑल इंडिया पेट्रोल पंप असोसिएशन (All India Petrol Pump Association) केंद्र सरकारचा निषेध नोंदवणार असून पेट्रोल पंप डीलर्स आज पेट्रोल-डिझेलची (Petrol Diesel) खरेदी तेल कंपन्यांकडून करणार नाही. महाराष्ट्रासोबतच देशातील 19 राज्यांमध्ये पेट्रोलपंप चालकांचे हे आंदोलन करण्यात होणार असल्याची माहीती आहे.

देशभरातील वाढते इंधन दर आणि होणारे नुकसान, ग्राहकांचे नुकसान मुद्यावरून पेट्रोल पंप चालक-मालकांनी हा निर्णय घेतला असून पेट्रोल पंप मात्र सुस्थितीत सुरु राहणार आहेत, त्यामुळे पेट्रोल-डिझेलची विक्री पंपांवर सुरुच राहणार असल्याची माहिती फामपेडा’चे अध्यक्ष उदय लोध यांनी दिली आहे. सर्वसामान्यांना कोणत्याही प्रकारे याचा फटका बसणार नाही, इंधन विक्री सुरू राहणार असल्याचे म्हटले आहे.

देशातील पेट्रोल-डिझेल चालक-मालकांनी आज हा मोठा निर्णय घेतल्याने काही ठिकाणी इंधनाचा तुटवडा भासू शकतो, असा अंदाजदेखील एकीकडे व्यक्त होत आहे. दरबदलाच्या चुकीच्या धोरणांमुळे आम्हाला अनेकदा मोठय़ा आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. दर कमी झाल्यावर डिलर्सचे प्रचंड नुकसान होते. पेट्रोल पंप चालकांसाठी शासनाने एक धोरण तयार करण्याची गरज आहे. या मागणीसाठी 31 मे 2022 रोजी देशव्यापी खरेदी बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे, असे या संघटनेने म्हटले आह़े.

देशातील पेट्रोल पंप चालक आज 31 मे रोजी तेल कंपन्यांकडून किंवा ऑईल डेपोमधून पेट्रोल-डिझेल खरेदी करणार नसल्याचं सांगितलं जातं आहे. फेडरेशनच्या मते, ‘‘पेट्रोलियम डिलर्स वर्षांनुवर्षे देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी राबत आहेत. जेव्हा नोटाबंदी, जीएसटी झाली तेव्हापासून कोरोना काळातही आम्ही शासनाला पूर्ण सहकार्य करून ग्राहकांना सेवा दिली. या काही वर्षांमध्ये आमच्या भांडवली गुंतवणुकीत दुपटीने वाढ झाली आणि सरकारचे उत्पन्न वाढले पण आमचे उत्पन्न वाढले नाही. आमचं म्हणणं सरकारपर्यंत पोहोचावे किंवा ते पोहोचवण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतल्याचं ‘फामपेडा’चे अध्यक्ष उदय लोध म्हणाले.

Share via
Copy link