केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शेतकर्यांना दिले नवनवीन तंत्रज्ञानाचे सल्ले l agrovision
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शेतकर्यांना दिले नवनवीन तंत्रज्ञानाचे सल्ले l
भव्य दिव्य अशा बाराव्या अग्रोविजन कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी बांबू शेती ,त्याचबरोबर इथेनॉल तंत्रज्ञान , ड्रोन फवारणी फवारणी इत्यादी क्षेत्रातील नवीन संधी याविषयी माहिती दिली.
बांबू शेतीत नवीन संधी कोणत्या?
-बांबूचा आपण कोळसाला पर्याय वापर म्हणून उपयोग करू शकतो.
- बांबूचा पावर प्लांट मध्ये वापर करून त्यापासून वीज निर्मिती करता येते. त्यामुळे शेतकऱ्याच्या बांबूला मोठ्या प्रमाणात मार्केट तयार होईल बांबू उत्पादन वाढवायला हवे.
- बांबू पासून नॅचरल कापडाची जशी शर्ट आपण तयार करु शकतो . त्या शर्ट मुळे घाम येत नाही.
ड्रोनचा फवारणी साठी वापर आता झाला स्वस्त !
ऍग्रो व्हिजन चे अध्यक्षस्थानावरून बोलले केंद्रीय मंत्री नितिन गडकरी
-जुन्या फवारणी ड्रोन ची किंमत सहा लाख रुपये होती कारण हे ड्रोन महागड्या अशा लिथियम बॅटरीवर चालत होते .
-नवीन तंत्रज्ञानामध्ये इथेनॉल वर चालणारे ड्रोन तयार करण्यात आले आहे .
त्यामुळे ते शेतकऱ्यांना स्वस्त किमतीत मिळनार आहे .
अशाप्रकारे इथेनॉलचा वाढता कल बघता इथेनॉल कसे तयार होणार?
तर इथेनॉल शेतकरी तयार करू शकतात तेही गवतापासून
- इथेनॉल वर चालणारी वाहने, ट्रॅक्टर ,ड्रोन मोठ्या प्रमाणात तयार होत आहे त्यामुळे इथेनॉलचे पंप उभारायला हवे.
-इथेनॉल चा उपयोग आपण पेट्रोल ला पर्याय म्हणून करू शकतो.
अशाप्रकारे इथेनॉल हे शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी घेऊन आलेलं आहे .