‘या’ वस्तूंवरील ‘जीएसटी’ अखेर रद्द, निर्मला सितारामण यांची मोठी घोषणा..!!
सर्वसामान्य माणूस महागाईने त्रस्त झालेला असताना, मोदी सरकारने काही दिवसांपूर्वी जीवनाश्यक वस्तूंंवर ‘जीएसटी’ लागू करण्याचा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणी 18 जुलैपासून होणार होती. गेल्या महिन्यात झालेल्या ‘जीएसटी परिषदे’च्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आरोग्य व शिक्षण सेवाही महाग झाल्या आहेत..
देशात आधीच महागाईने सामान्यांचं जगणं मुश्किल झालेले असताना, मोदी सरकारने ‘जीएसटी’ कक्षेत नसलेल्या वस्तूंवरही कर आकारायला सुरुवात केली. शिवाय, ज्या वस्तूंवर आधीच ‘जीएसटी’ होता, त्यातही वाढ केली. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात त्याचे पडसाद उमटले.. विरोधी पक्षांनी संसदेत चांगलाच गदारोळ केला..
‘जीएसटी’चा निर्णय रद्द
मोदी सरकारच्या या निर्णयामुळे वस्तूंच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ होणार होती. त्यामुळे सरकारविषयी जनतेतही प्रचंड रोष निर्माण होऊ लागला होता.. ही बाब लक्षात आल्यावर अखेर मोदी सरकारने माघार घेतली… केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी या वस्तूंवरील ‘जीएसटी’चा निर्णय रद्द करीत असल्याची घोषणा ट्विटरवर केली आहे..
सुट्या धान्यासह सुट्या डाळी, गहू, राई, ओट्स, मका, तांदूळ, पीठ, रवा, बेसन, मुढी, दही व लस्सीवर 5 टक्के ‘जीएसटी’ लागू होणार नसल्याची घोषणा अर्थमंत्री सितारामण यांनी केली आहे.. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे..
‘जीएसटी परिषदे’ची गेल्या महिन्यात बैठक झाली.. त्यात 25 किलोच्या प्री-पॅकेज केलेल्या व लेबल केलेल्या खाद्यपदार्थांवर 5 टक्के ‘जीएसटी’ लागू केला होता. त्याची अंमलबजावणी 18 जुलैपासून केली जाणार असल्याचे सांगण्यात आले होते.. त्यामुळे अनेक वस्तू, खाद्यपदार्थांच्या किंमतीत मोठी वाढ झाली होती.
देशभरातून वाढता विरोध
मोदी सरकारच्या या निर्णयाला मोठ्या प्रमाणात विरोध होत होता. व्यापारी संघटनांनीही हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली होती. आधीच सामान्य नागरिक महागाईने हैराण झालेले असताना, केंद्राने जीवनाश्यक वस्तूंवर ‘जीएसटी’ लावल्याने सरकारविरोधात रोष वाढू लागला होता. संसदेतही विरोधकांनी या मुद्द्यावरुन सरकारला चांगलेच धारेवर धरले..
देशभरातून वाढत असलेला विरोध पाहून अखेर मोदी सरकारने जीवनाश्यक वस्तूंवरील ‘जीएसटी’ मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
आम्ही कास्तकार.कॉम वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा. तसेच शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करू शकता.