paddy farming If you want to earn lakhs from agriculture then cultivate these variety of grain, you will get bumper yield
[ad_1]

Paddy Farming: धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी (Farmer) आजची ही बातमी विशेष आहे. शेतकरी मित्रांनो जर तुम्ही देखील धान लागवडीचा (Hybrid Paddy Cultivation) विचार करत असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी धान लागवडीविषयी महत्वाची माहिती घेऊन आलो आहोत.
खरं पाहता वाढत्या लोकसंख्येला पोसण्यासाठी कृषी क्षेत्रात (Farming) नवी क्रांती आणली जात आहे, जेणेकरून अन्नसुरक्षा कायम राहील. राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर तृणधान्यांमध्ये भाताला मोठी मागणी आहे, त्यामुळे आता शेतकऱ्यांना संकरित तांदळाच्या जाती (Hybrid Paddy Variety) वाढवण्याचा सल्ला दिला जात आहे.
वास्तविक, हायब्रीड भातशेतीवर (Rice Farming) भर देण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे उत्पादन. काही अहवालांनुसार, त्याचे उत्पादन सामान्य धानापेक्षा 15 टक्के जास्त आहे. यामुळे आज आपण हायब्रीड धानाच्या काही सुधारित जाती जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर.
हायब्रीड धानाचे काही सुधारित वाण
APHR-1, DRRH-1, APHR-2, PHB-71, PA-6201, सह्याद्री, नरेंद्र शंकर धन-2 आणि DRRH-1
संकरित भाताच्या प्रादेशिक जाती
»तेलंगणा, रायलसीमा आणि अप्पर कोस्टल आंध्र प्रदेशसाठी MGR-1, Korah-2 आणि ADTRH-1 या वाण प्रमुख आहेत.
»तामिळनाडूसाठी KRHKRH-2 आणि CNRH-3 या भाताच्या जाती सर्वोत्तम आहेत.
»पश्चिम बंगाल आणि पश्चिम उत्तर प्रदेशसाठी पंत शंकर म्हणजे धन-1 आणि सह्याद्री या जाती सर्वोत्तम असल्याचे सांगितले जाते.
»नरेंद्र शंकर धन-2 हे महाराष्ट्र आणि पूर्व उत्तर प्रदेशातील कोकण क्षेत्रासाठी सर्वोत्तम संकरित भाताचे वाण आहे.
»तामिळनाडू, हरियाणा, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशचे शेतकरी PHB-71, PA 6201 (2000), HR-120 (2001) धानाचे वाण देखील वाढवू शकतात.
»आंध्र प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्राचा कोकण प्रदेश, उत्तरांचल मैदान, पूर्व उत्तर प्रदेश, ओरिसा आणि त्रिपुरा हरियाणा, पंजाब, पश्चिम उत्तर प्रदेश, दिल्ली पुसा आरएच-10 (2001) ही सर्वोत्तम वाण आहे.
»भात संशोधन संचालनालय (DRR), हैदराबादने संकरित भात लागवडीसाठी वाण विकसित केले आहेत ज्याची माती, हवामान आणि इतर संबंधित घटकांमधील फरकांवर अवलंबून स्थानिक पातळीवर पेरणी करता येते.
निश्चितच भाताच्या या जाती शेतकरी बांधवांसाठी फायद्याचा ठरणार आहेतं. यामुळे धान उत्पादक शेतकर्यांच्या उत्पन्नात भरीव वाढ होणार आहे. शेतकरी बांधवांनी मात्र धानाची पेरणी करण्यापूर्वी कृषी तज्ञांच्या सल्ल्यानेचं भातांच्या जातीची निवड करणे महत्त्वाचे ठरणार आहे.
[ad_2]
आम्ही कास्तकार.कॉम वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा. तसेच शेतीविषयक माहितीसाठीआम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करू शकता.