Panjabrao Dakh: पंजाबरावांचा 28 ऑगस्टपर्यंतचा हवामान अंदाज....! आजपासून 'या' तारखेपर्यंत पावसाची उघडीप, 'या' दिवशी पुन्हा पाऊस, वाचा सविस्तर - Amhi Kastkar
Agriculture News in Marathi

Panjabrao Dakh: पंजाबरावांचा 28 ऑगस्टपर्यंतचा हवामान अंदाज….! आजपासून ‘या’ तारखेपर्यंत पावसाची उघडीप, ‘या’ दिवशी पुन्हा पाऊस, वाचा सविस्तर

0
Rate this post

[ad_1]

Panjabrao Dakh: परभणीचे प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डख (Panjabrao Dakh News) यांनी आपला सुधारित हवामान अंदाज (Panjabrao Dakh Havaman Andaj) जारी केला आहे. दरम्यान राज्यात नव्हे नव्हे तर संपूर्ण देशात मान्सूनच्या (Monsoon) दुसऱ्या चरणातील पावसाने (Monsoon News) अक्षरशः थैमान माजवल आहे. यामुळे शेतकरी बांधवांना (Farmer) अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. सध्या राज्यात कोसळत असलेल्या पावसामुळे (Rain) जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र आहे.

मात्र, पंजाबराव डख यांच्या हवामान अंदाजामुळे (Panjab Dakh Weather Report) शेतकरी बांधवांना तसेच सामान्य नागरिकांस दिलासा मिळणार आहे. पंजाबराव यांनी वर्तवलेल्या नवीन सुधारित हवामान अंदाजानुसार (Maharashtra Weather Update) आज पासून राज्यात पावसाचा जोर कमी होणार आहे. 17, 18 आणि 19 ऑगस्ट रोजी राज्यात पावसाची उघडीप राहणार असून राज्यात सर्वत्र सूर्यदर्शन बघायला मिळू शकते.

यामुळे शेतकरी बांधवांनी या तीन दिवसात आपली शेतीची कामे करून घ्यावीत असा सल्ला पंजाबराव यांनी दिला आहे. कारण की, 19 तारखे नंतर पुन्हा एकदा पावसासाठी (Rain Alert) पोषक वातावरण तयार होणार आहे. 20 तारखेला राज्यात पुन्हा एकदा पावसाचा कम बॅक होणार असून 20 21 22 23 ऑगस्ट रोजी राज्यात सर्वत्र पावसाची हजेरी राहणार आहे. 23 ऑगस्ट नंतर पुन्हा एक दिवस राज्यात सूर्यदर्शन बघायला मिळणार आहे.

त्यानंतर पुन्हा एकदा 25 तारखेपासून ते 28 तारखेपर्यंत राज्यात पावसाचे वातावरण राहणार असल्याचा अंदाज पंजाब राव यांनी वर्तवला आहे. यामुळे शेतकरी बांधवांनी येत्या तीन दिवसात आपली शेतीची (Agriculture) कामे करून घ्यावीत. तसेच जेव्हा पावसाची उघडीप राहील तेव्हा आपली शेतीची कामे करावीत असा सल्ला पंजाबराव (Panjabrao Dakh Advice) यांनी जारी केला आहे.

निश्चितच सध्या राज्यात कोसळत असलेल्या पावसापासून दिलासा मिळणार असल्याचा अंदाज पंजाबराव यांनी वर्तवला आहे. यामुळे पीक व्यवस्थापनासाठी (Crop Management) पाऊस उघडण्याची वाट पाहणाऱ्या बळीराजाच्या चेहऱ्यावर यामुळे समाधानाचे भाव बघायला मिळत आहेत.

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी इथे नमूद करू इच्छितो की, राज्यातील शेतकरी बांधवाचा पंजाब रावांच्या हवामान अंदाजा वर मोठा गाढा विश्वास आहे. शेतकरी बांधवांच्या मते पंजाब राव यांचा अंदाज तंतोतंत खरा ठरत असून यामुळे त्यांना शेती कामात मदत होत आहे.

[ad_2]

आम्ही कास्तकार.कॉम वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा. तसेच शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करू शकता.

Share via
Copy link