Panjabrao Dakh: शेतीत आता 'हे' काम करावे लागणार, तेव्हाचं यश मिळणार; पंजाबरावांनी सांगितला शेतीत यशस्वी होण्याचा मार्ग - Amhi Kastkar
Agriculture News in Marathi

Panjabrao Dakh: शेतीत आता ‘हे’ काम करावे लागणार, तेव्हाचं यश मिळणार; पंजाबरावांनी सांगितला शेतीत यशस्वी होण्याचा मार्ग

0
Rate this post

[ad_1]

Panjabrao Dakh: पंजाबराव डख (Panjabrao Dakh) महाराष्ट्रात एक नावाजलेले नाव आहे. पंजाबरावं (Panjabrao Dakh News) गेल्या काही वर्षांपासून आपल्या हवामान अंदाजासाठी (Panjabrao Dakh Havaman Andaz) संपूर्ण राज्यात रोज चर्चीले जाणारे व्यक्तिमत्व आहे.

पंजाबरावं परभणी जिल्ह्यातील एक हवामान तज्ज्ञ म्हणून संपूर्ण राज्यात ओळखले जातात. शेतकरी बांधव (Farmer) पंजाबरावांनी वर्तवलेल्या हवामान अंदाजावर आपली शेतीकामाचे (Farming) नियोजन आखत असतात. म्हणजेचं शेतकऱ्यांचा पंजाबराव यांनी वर्तवलेल्या हवामान अंदाजावर गाढा विश्वास आहे.

पंजाबराव फक्त हवामान तज्ञ नसून ते आपल्या गावातील शाळेत अंशकालीन शिक्षक म्हणून देखील कार्यरत आहेत. एवढेच नाहीतर पंजाबराव एक प्रयोगशील शेतकरी (Experimental farmer) देखील आहेत.

ते आपली वडिलोपार्जित दहा एकर शेतजमीन कसत आहेत. विशेष म्हणजे पंजाबराव सोयाबीनची यशस्वी लागवड करतात. यामुळे हवामान अंदाजा व्यतिरिक्त पंजाबराव शेतकरी बांधवांना शेतीमधील बारकावे देखील समजवत असतात. नुकत्याच एक-दोन दिवसांपूर्वी पंजाबरावांनी नांदेड मधील अर्धापूर येथे एका शिबिरात शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आहे.

नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर येथे आयोजित एका शिबिरात बोलताना पंजाबराव यांनी नमूद केले की, शेतकरी बांधवांनी आता हवामानावर आधारित शेती (Agriculture) करणे अतिशय आवश्यक बनले आहे.

पंजाबरावांच्या मते, शेतकरी बांधवांनी पीकपद्धतीत हवामानाच्या आधारावर बदल केला पाहिजे. शेतकरी बांधवानी हवामानाचा अंदाज घेऊन कमी किंवा जास्त पाण्यात तग धरू शकणाऱ्या पिकांची शेती केली पाहिजे, असं पंजाबराव डख यांनी यावेळी नमूद केले.

14 जुलै म्हणजेचं गुरुवारी नांदेड येथे अर्धापूर मधील नांदला दिग्रस या ठिकाणी एका शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या दिवशी पंजाबरावांना प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले होते.

शिबिराला मार्गदर्शन करताना परभणी भूमिपुत्र हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी सांगितले की, राज्यातील सर्व शेतकरी बांधवानी हवामानाचा अचूक अंदाज घेऊन पेरणी केली पाहिजे. हवामानाचा अचूक अंदाज बांधून पिकांची निवड केली पाहिजे तसेच काढणीपर्यंतची कामे देखील हवामानाचा अचूक अंदाज घेऊनच करावीत.

पंजाब रावं यांनी सांगितलेल्या महत्वपूर्ण माहिती नुसार, काळ्या जमिनीवर गारपीट सहसा होत नाही. मात्र खडकाळ जमिनीवर गारपीट नेहमीचं होत असते. पंजाब राव यांच्या मते, दरवर्षी शेतकरी बांधवांनी पावसाचा अंदाज बघून कमी पाण्याची किंवा जास्त पाण्याची पिके घेतली पाहिजे.

[ad_2]

आम्ही कास्तकार.कॉम वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा. तसेच शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करू शकता.

Share via
Copy link