Panjabrao Dakh Biography: जगात जर्मनी भारतातं परभणी…!! परभणीचा अवलिया हवामान तज्ज्ञ शेतकरीपुत्र पंजाबराव डख यांचा जीवनपरिचय - Amhi Kastkar
Agriculture News in Marathi

Panjabrao Dakh Biography: जगात जर्मनी भारतातं परभणी…!! परभणीचा अवलिया हवामान तज्ज्ञ शेतकरीपुत्र पंजाबराव डख यांचा जीवनपरिचय

0
4.7/5 - (4 votes)

[ad_1]

Panjabrao Dakh: जगात जर्मनी अन भारतात परभणी असं का म्हटलं जातं याचं एक जिवंत उदाहरण आहे पंजाबराव डख. पंजाबराव डख (Panjabrao Dakh News) महाराष्ट्रासाठी हे नाव काही नवं नाही. हवामान अंदाजासाठी संपूर्ण महाराष्ट्रात पंजाबराव डख साहेबांचं नाव गेल्या काही वर्षांपासून गाजतंया.

शेतकऱ्याच्या बांधापासून ते टीव्ही चॅनेलपर्यंत सर्वत्र पंजाबराव डख हे नाव सध्या मोठ्या चर्चेचा विषय ठरत आहे. शेतकरी बांधवांना (Farmer) पंजाबराव डख (Panjab Dakh Weather Report) यांच्या हवामान अंदाजावर मोठा गाढा विश्वास आहे. हेच कारण आहे की पंजाबराव साहेबांचा अंदाज अवघ्या तीन मिनिटात राज्यातील तीन कोटी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतो.

यासाठी पंजाबरावांनी व्हाट्सअपचा प्रभावी वापर केला आहे. हवामान अंदाजासाठी महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांमध्ये आपली एक वेगळी छाप सोडणारे पंजाबराव नेमके आहेत तरी कोण? त्यांचं शिक्षण किती? (Panjabrao Dakh Biography) हवामान अंदाज वर्तवण्याव्यतिरिक्त डख करतात काय याविषयी आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कोण आहेतं पंजाबराव डख?

पंजाबराव डख (Panjabrao Dakh Mansoon Update) हे परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील मौजे गुगळी धामणगाव येथे वास्तव्यास आहेत. खरं पाहता पंजाबराव डख एक शेतकरी कुटुंबातील आहेतं. सध्या पंजाबराव डखं त्यांच्या गावातील शाळेत अंशकालीन शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. शेतकरी पुत्र असल्याने ते अगदी लहानपणापासून टेलिव्हिजन वरती हवामानाचा अंदाज जवळून पाहत असतं.

टीव्ही वरती हवामानाचा अंदाज ऐकल्यानंतर ते आपल्या वडिलांसोबत नेहमीच पावसाबाबत तसेच हवामानात होत असलेल्या बदला बाबत चर्चा करत असत. एवढेच नाही तर ते आपल्या स्वतःच्या निरीक्षणाची देखील नोंद करत असत. कालांतराने पंजाबराव यांना निसर्गाच्या संकेतावरून तसेच संगणकाचा, उपग्रहांचा, नकाशांचा वापर करून पंजाबराव निरीक्षणाची नोंद करू लागले. हवामान अंदाजाच्या कुतूहलापोटी त्यांनी सी-डॅक कोर्स देखील केला आहे.

एवढेच नाही तर यावरून ते पावसाचे भाकीत देखील वर्तवू लागले. पंजाबराव यांनी वर्तवलेले पावसाचे भाकीत तंतोतंत खरे उतरू लागले आणि यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये पंजाब रावांच्या हवामान अंदाजाची विश्वासार्हता वाढली. हळूहळू पंजाबरावांचे हवामान अंदाजाचे वादळ संपूर्ण राज्यात घोंगावू लागले. गेली 26 वर्ष पंजाबराव हवामानाचा अंदाज वर्तवत आहेत. आजच्या घडीला पंजाबरावांचा हवामान अंदाज संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचत असून शेतकरी बांधवांना याचा फायदा होत असल्याचा दावा शेतकरी करत आहेत.

Panjab Dakh Video Biography in Marathi

पंजाबरावांना शेती किती आहे बर?

पंजाबराव हे शेतकरी पुत्र आहेत. त्यांच्याकडे वडिलोपार्जित दहा एकर शेत जमीन आहे. पंजाबराव ज्या पद्धतीने हवामान अंदाजासाठी ओळखले जातात अगदी त्याच पद्धतीने ते शेती व्यवसायात प्रयोगासाठी देखील ओळखले जातात. ते आपल्या शेतात सोयाबीन, हरभरा पिकाची शेती करत असून त्याचे विक्रमी उत्पादन घेत आहेत.

विशेष म्हणजे सोयाबीन व हरभरा पिकातून पंजाबराव डख यांना वार्षिक आठ लाखांचे उत्पन्न मिळत आहे. हवामान अंदाजा बरोबरच शेतकरी बांधवांना शेतीचा सल्लादेखील पंजाबराव नेहमीच देत असतात. यामुळे परभणीचे सुपुत्र पंजाबरावं डख कायमच चर्चेत असतात.

एकही रुपया न घेता हवामानाची माहिती देतात

पंजाबराव डख राज्यातील तीन कोटी शेतकरी बांधवांना हवामानाचा अंदाज पुरवत असतात. विशेष म्हणजे यासाठी पंजाबराव डख कुठलेही मानधन स्वीकारत नाही. असे सांगितले जाते की पंजाबराव डख यांना काही शेतकऱ्यांनी त्यांच्या हवामान अंदाजाचा फायदा झाला म्हणून त्यांना काही पैसे देऊ केले होते. मात्र शेतकरी पुत्र पंजाबराव डख यांनी ती रक्कम नाकारली आणि आज देखील पंजाबराव डख हवामानाचा अंदाज निशुल्क महाराष्ट्रातील जनतेसाठी उपलब्ध करून देत आहेत. 

[ad_2]

आम्ही कास्तकार.कॉम वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा. तसेच शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करू शकता.

Panjab Dakh Parbhani Biography in Marathi
Share via
Copy link