3 लाख रुपयांपर्यंत बिन व्याजी कर्ज मिळणार। Panjabrao Deshmukh Vyaj Savalat Yojana

Dr Panjabrao Deshmukh vyaj savlat yojana | पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना 2021

  • पीक कर्जाची नियमित परतफेड कऱणाऱ्या शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंतच्या कर्जासाठी शून्य टक्के व्याज.
  • व्याज सवलतीमध्ये दोन टक्क्यांनी वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांना फायदा

शेतकरी मित्रांनो, पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आता तीन लाखांपर्यंतच्या कर्जासाठी शून्य टक्के दराने व्याज आकारणी केली जाईल.

Dr Panjabrao Deshmukh vyaj savlat yojana या योजनेत एक लाख ते तीन लाखांच्या कर्जमर्यादेत विहीत मुदतीत कर्जाची परतफेड केल्यास सध्याच्या एक टक्के व्याजदरात आणखी दोन टक्के व्याज दर सवलत देण्याचा निर्णय १० जून २०२१ ला झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

मंत्रिमंडळ बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तीन लाखांपर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्के व्याज दराने देण्याची घोषणा केली होती.

या निर्णयामुळे राज्य शासन देत असलेली व्याज दर सवलत तीन टक्के व केंद्र शासनाकडून मिळणारी तीन टक्के व्याज सवलत या दोन्हीचा एकत्रित फायदा मिळाल्याने शेतकऱ्यांना सदर पीक कर्ज शून्य टक्के व्याज दराने उपलब्ध होणार आहे.

Dr Panjabrao Deshmukh vyaj savlat yojana विहित मुदतीत अल्प मुदत पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून व्याज सवलत देण्यात येते.

योजनेत विहित मुदतीत अल्पमुदत पीक कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना १ लाख रुपये कर्ज मर्यादेपर्यंत ३% व्याज सवलत १ लाख ते ३ लाख रुपये या कर्ज मर्यादेपर्यंत १% टक्का व्याज दरात सवलत देण्यात येत होती,

आता १ लाख ते ३ लाख रुपये या कर्ज मर्यादेमध्ये शेतकऱ्यांनी अल्पमुदत पीक कर्जाची परतफेड विहित मुदतीमध्ये केल्यास त्यांना अधिक २% व्याज दरात सवलत देण्याचा निर्णय मंत्रीमंडळाने घेतला आहे.

शेतकर्यांना तीन लाखांपर्यंतचे कर्ज बिनव्याजी

  • राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी मंगळवारी बैठक झाली.
  • त्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय. शेतकऱ्यांना पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना तर्गत एक लाखापर्यंतचे कर्ज बिनव्याजी तर तीन लाखांपर्यंतचे कर्ज दोन टक्के व्याजाने दिले जाते.
  • मात्र, यंदाच्या खरीप हंगामासाठी तीन लाखांपर्यंतचे कर्ज बिनव्याजी देण्यात येणार असल्याचं ठाकरे सरकारनं सांगितलंय.

डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजेचा दि.११ जुने २०२१ चा शासन निर्णय (GR) डाउनलोड करण्यासाठी खालील बटणवर क्लिक करा.

अधिक माहितीसाठी खालील व्हिडिओ पहा:

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाजमान्सून 2021 अपडेटपाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद

हे पण वाचा –

Leave a Comment

X