काय आहेत इंधनाचे दर (Petrol-Diesel Price on 4th May 2022)
Petrol-Diesel Price Today(May 04, 2022) – Citywise List
पेट्रोलियम कंपन्यांकडून आज पेट्रोल, डिझेलचे नवे दर (Petrol Diesel price) जारी करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार आज देखील इंधनाच्या किमतीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आज 22 दिवस झाले, पेट्रोल (Petrol), डिझेलचे (Diesel) दर स्थिर आहेत. सहा एप्रिल रोजी पेट्रोल, डिझेलच्या दरात शेवटची वाढ करण्यात आली होती. मात्र त्यानंतर आजपर्यंत पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर ठेवण्यात आले आहेत. एकीकडे कच्च्या तेलाचे दर आतंरराष्ट्रीय पातळीवर वाढताना दिसत आहेत, मात्र दुसरीकडे भारतात पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर ठेवण्यात आले आहेत. पेट्रोलियम कंपन्यांनी जारी केलेल्या नव्या दरानुसार आज राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर 105.41 रुपये आणि डिझेल 96.67 रुपये लिटर आहे. आर्थिक राजधांनी मुंबईमध्ये पेट्रोल 120.51 रुपये तर डिझेल 104.77 रुपये लिटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोल प्रति लिटर 115.12 आणि डिझेल 99.83 रुपये प्रति लिटर आहे. तर चेन्नईमध्ये पेट्रोल, डिझेलचे दर अनुक्रमे 110.85 रुपये आणि 100.94 प्रति लिटर आहे.
राज्याच्या प्रमुख शहरातील दर
- पेट्रोलियम कंपन्यांकडून आज जाहीर करण्यात आलेल्या नव्या दरानुसार राज्यात इंधनाचे दर स्थिर आहेत. आज 22 व्या दिवशी देखील इंधनाच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मुंबईमध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर 120.51 रुपये तर डिझेल 104.77 रुपये लिटर आहे.
- राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर 120.40 तर डिझेलचा भाव 103.73 रुपये लिटर आहे.
- पुण्यात पेट्रोल, डिझेल अनुक्रमे 120.20 आणि 103.10 रुपये प्रति लिटर आहे.
- राज्यात सर्वाधिक महाग पेट्रोल परभणीमध्ये मिळत असून, परभणीमध्ये पेट्रोल 123.51 रुपये लिटर तर डिझेल प्रति लिटर 106.10 रुपये लिटर आहे.
- औरंगाबादमध्ये पेट्रोलचा दर 121.13 रुपये असून डिझेलचा भाव 103.79 रुपये आहे.
दररोज सकाळी 6 वाजता बदलते किंमत
दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते
अशाप्रकारे घरबसल्या तपासा पेट्रोल-डिझेलचे नवे दर
पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही एसएमएस (SMS)च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. त्याचप्रमाणे देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी करतात. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. तसंच आपण मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता.
इंडियन ऑइलचे कस्टमर 92249 92249 वर SMS पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल. एचपीसीएल कस्टमर HPPrice लिहून 9222201122 या क्रमांकावर मेसेज पाठवून तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलची किंमत जाणून घेऊ शकतात.
आपल्या जिल्ह्याचे पेट्रोल डिझेल चे भाव पहा
आम्ही कास्तकार.कॉम वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार.इन या वेबसाईटला तसेच आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करू शकता.