Petrol Diesel Price Today: पेट्रोल-डिझेल 5 रुपये स्वस्त! शिंदे सरकारचा निर्णय तात्काळ आपल्या गाडीची टाकी फुल करा - Amhi Kastkar
Agriculture News in Marathi

Petrol Diesel Price Today: पेट्रोल-डिझेल 5 रुपये स्वस्त! शिंदे सरकारचा निर्णय तात्काळ आपल्या गाडीची टाकी फुल करा

0
4.2/5 - (115 votes)

Petrol Diesel Price Today near me, maharashtra नमस्कार मित्रांनो आज आपण पेट्रोल आणि डिझेलचे आजचे भाव पाहणार आहोत. पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर (Petrol-Diesel Price Today) जारी करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार आज देखील पेट्रोल, डिझेलच्या (Fuel Rate Today) किमतीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

Maharashtra Reduce VAT On Petrol Diesel :  राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यात आता पेट्रोल, डिझेलच्या दरावरील व्हॅट कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यात पेट्रोल 5 रुपये आणि डिझेल 3 रुपये प्रति लिटरने स्वस्त झाले आहे. या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर 10 हजार कोटींचा बोझा पडणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. आज  मध्यरात्रीपासून पेट्रोल, डिझेलचे नवीन दर लागू करण्यात आले आहेत. 

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर विधानसभेतील विशेष अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पेट्रोल, डिझेल दर आणखी कमी करण्याची घोषणा केली होती. केंद्र सरकारने एक्साईज ड्युटी कमी केल्यानंतर राज्य सरकारने व्हॅट कमी करावा अशी मागणी सातत्याने त्यावेळी विरोधात असलेल्या भाजपकडून करण्यात येत होती. मात्र, त्यावेळी राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारने व्हॅट कमी करण्यास नकार दिला. त्याऐवजी केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणावर वाढवलेल्या करात कपात करावी अशी मागणी करण्यात आली होती. केंद्र सरकारने राज्याचा जीएसटी परतावाही दिला नसल्याचा मुद्दा महाविकास आघाडीकडून अधोरेखित करण्यात आला होता. 

शिंदे-फडणवीस सरकारने आजच्या कॅबिनेट बैठकीत हा मोठा निर्णय घेतला. या निर्णयामुळे राज्यातील जनतेला आणि मालवाहतूकदारांनाही दिलासा मिळणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. केंद्र सरकारने कर कपात केल्यानंतर राज्यांनीदेखील करात कपात करावी असे आवाहन केले होते. काही राज्यांनी याला प्रतिसाद देत कर कपात केली होती. त्यानंतर आता महाराष्ट्र सरकारनेदेखील राज्याच्या करात कपात केली आहे. कर कपातीमुळे राज्याच्या तिजोरीवर 10 हजार कोटींचा बोझा पडणार आहे. ही तूट भरून काढण्यासाठी कोणत्याही विकासकामाच्या खर्चाला कात्री लावणार नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. 

इंधन दरवाढीवरून केंद्र सरकारवर टीका


पेट्रोल डिझेलचे भाव पहा

finger down

येथे क्लिक करून पेट्रोल डिझेलचे भाव पहा 


पेट्रोल पंप डीलरचे कमिशन इंधन महाग करते

देशातील पेट्रोल पंप डीलर्सही पेट्रोल आणि डिझेलवर प्रतिलिटर कमिशन आकारतात. त्याची किंमतही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात जोडली जाते, ज्यामुळे ते महाग होते.

1 बॅरल चा अर्थ जाणून घ्या

कच्चे तेल बॅरलमध्ये मोजले जाते. आंतरराष्ट्रीय स्तरावर हे मानक युनिट आहे. 1 बॅरल कच्चे तेल म्हणजे सुमारे 239 लिटर कच्चे तेल किंवा कच्चे तेल. या कच्च्या तेलाचे शुद्धीकरण करून पेट्रोलियम पदार्थ मिळतात. पेट्रोल आणि डिझेलशिवाय हवाई इंधन, रॉकेल, पॅराफिन मेण यांसारखे पदार्थही कच्च्या तेलापासून मिळतात.

1 बॅरल क्रूडमधून तुम्हाला किती पेट्रोल मिळते?

1 बॅरल कच्च्या तेलाचे शुद्धीकरण केल्यानंतर सुमारे 74 लिटर पेट्रोल, 36 लिटर डिझेल, 30 लिटर जेट इंधन, 6 लिटर प्रोपेन आणि सुमारे 34 लिटर ब्युटेन, डांबर, सल्फर इत्यादी मिळते.

1947 मध्ये पेट्रोलचे दर किती पैसे लिटर होते ते जाणून घ्या

आजकाल पेट्रोलचे दर हा चर्चेचा विषय राहिला आहे. पण तुम्हाला माहिती आहे की 1947 मध्ये देश स्वतंत्र झाला तेव्हा देशात पेट्रोलचे दर काय होते. तुम्हाला माहिती नसेल तर जाणून घ्या, त्यावेळी देशात पेट्रोलचा दर प्रतिलिटर २७ पैसे होता.


पेट्रोल डिझेलचे भाव पहा

finger down

येथे क्लिक करून पेट्रोल डिझेलचे भाव पहा 


petrol-diesel-price-today 5 rupees swast taki full kra
Share via
Copy link