PM-किसान: 19000 कोटी रूपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा; असा तपासा तुमच्या खात्याचा तपशील


pm-kisan

नवी दिल्ली। सरकारच्या ताज्या आकडेवारीनुसार, केंद्राने सुरू केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (पीएम-किसान) अंतर्गत लॉकडाऊन दरम्यान देशभरातील सुमारे ९.६७ कोटी शेतकर्‍यांच्या खात्यावर पैसे जमा केलेत. यासाठी मागील दोन महिन्यात सरकारने जवळपास १९ हजार कोटी रूपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. हा निधी डीबीटी मार्फत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आला आहे. त्याचबरोर या कालावधीत शेतकऱ्यांची गैरसोय लक्षात घेऊन सरकारने बियाणे पुरवठा देखील करण्याचे प्रयत्न केले आहेत.

पंतप्रधान-किसान योजना काय आहे?

मोदी सरकारच्या पुढाकाराने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत समाविष्ठ शेतकऱ्यांना किमान उत्पन्न आधार म्हणून दर वर्षी ६००० रूपये दिले जातात. हे ६००० रूपये तीन हप्त्यात विभागून दिले जात आहेत. पंतप्रधान-किसान योजनेची घोषणा केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी १ फेब्रुवारी २०१९ रोजीच्या अंतरिम केंद्रीय अर्थसंकल्पात केली होती. या योजनेसाठी ७५ कोटी वार्षिक निधी वितरित करण्याचे सरकारचे धोरण असून १४.५ कोटी शेतकऱ्यांना लाभ देण्याचे उद्दिष्ट आहे. मात्र अद्याप १० कोटींच्या आसपासच शेतकऱ्यांना या योजनेच्या प्रत्यक्ष लाभ मिळाला आहे. 

हे देखील वाचाPM किसान योजनेबद्दलची महत्वाची बातमी

योजना चालू झाल्यापासून आत्तापर्यंत बऱ्याचशा शेतकऱ्यांना ६ हप्त्यांपर्यंत देखील पैसे मिळाले आहेत. तर काही शेतकऱ्यांना १-२ हप्तेच मिळाले आहेत. काही तांत्रिक दोषांमुळे शेतकऱ्यांना या योजनेतून पैसे मिळालेले नाहीत. केंद्र सरकारची योजना असल्या कारणाने यासंदर्भात कुठे तक्रार करावी, कुणाशी संपर्क साधावा याबाबत प्रत्येक राज्यातील शेतकरी संभ्रमावस्थेत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची होणारी ही अडचण दूर करण्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.Source link

Leave a Comment

X