पीएम किसान योजनेचे पैसे आजही बँकेत आले नाहीत? पहा कधी मिळणार?
पीएम किसान योजनेचा १० वा हप्ता आजपासुन शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार होता. याबाबत कोणतेही अपडेट आलेले नाहीत त्यामुळे पैशे येतील अशी आशा धरलेले शेतकरी निराश झाले आहेत. पुढच्या आठवड्यात (Week) येईल १० वा हप्ता असा अंदाज.
पीएम मोदींच्या कार्यक्रमांमुळे चर्चा सुरू-
विविध बातम्यांमधून (News) १५ डिसेंबेला पैसे शेतकऱ्याच्या (Farmer) बँक खात्यात जमा होतील असे सांगण्यात येत होते. १६ डिसेंबरला मोदी शेतकऱ्याच्या कार्यक्रमात येणार असल्याने १६ डिसेंबरला हप्ता जमा होईल अशी चर्चा (Discussion) सुरू झाली.
कार्यक्रमात मोदींनी सांगितले नैसर्गिक शेतीचे फायदे-
हा कार्यक्रम (Program) गुजरात मध्ये होता. गुजरातमधील पाच हजार शेतकरी या कार्यक्रमाला उपस्थित होते. मोदींनी यामध्ये फक्त नैसर्गिक (Natural) शेतीविषयी सांगितले. हप्ता कधी जमा होणार याबाबत उल्लेख देखील केला नाही.
वाचा –
या करणांमुळे विलंब होत आहे-
राज्यांनी RFT वर सही केली आहे पण FTO अजूनही तयार झालेला नाही हा तयार झाल्यानंतरच शेतकऱ्यांच्या बँक (Bank) खात्यात पैसे (Money) जमा केले जातात.
सौजन्य - मी ई शेतकरी