PM Kisan चा अकरावा हप्ता मिळणार या तारखेला, पण त्या आधी ई -केवायसी अनिर्वाय! ही आहे शेवटची तारीख
मुंबई :पीएम किसानचा अकराव्या हप्त्याची तारीख जवळ आली आहे. 11 वा हप्ता मिळण्यासाठी शेतकऱ्यांना केवायसी करणे गरजेचे आहे का ? असा प्रश्न सर्व शेतकर्यांना पडलेला आहे . आजच्या या लेखामध्ये आपण तुमच्या सर्व प्रश्नाचे निवारण करणार आहोत. ज्या गोष्टीची सर्व शेतकरी आतुरतेने वाट पाहत होते शेवटी तो दिवस आलाच. चला, तर बघू या काय आहे नवीन तारीख आणि ई- केवायसी ?
(Pm kisan latest update)
अकराव्या हप्त्याची तारीख?
पी एम किसान निधी योजनेचा(pm kisan nidhi yojana maharashtra)अकरावा हप्ता शेतकऱ्यांना एप्रिल ते जुलै महिन्यामध्ये मिळणार आहे. शेतकरी सन्मान निधी चे अंतर्गत शेतकऱ्यांना दोन हजाराचे तीन हप्ते म्हणजेच वार्षिक सहा हजार रुपये मिळतात .आतापर्यंत या योजनेची दहा हप्ते पूर्ण झाले आहेत अकराव्या हप्त्याची तारीखही ठरलेली आहे तर हा अकरावा हप्ता शेतकऱ्यांना एप्रिल ते जुलै महिन्यामध्ये मिळणार आहे हा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा केला जाईल.(pm kisan 2022)
ई- केवायसी(e-kyc) करणे गरजेचे आहे का ?
आतापर्यंतचे पीएम किसान निधीचे (pm kisan 11th installment)10 हप्ते पूर्ण झाले आहेत .यानंतरच्या अकराव्या हप्त्यासाठी केवायसी करणे केंद्र सरकारने म्हणजेच मोदी सरकारने अनिर्वाय केले आहे. पीएम किसान (PM kisan)योजनेअंतर्गत होणारा घोटाळा काढण्यासाठी सरकारने ही केवायसी सर्व शेतकऱ्यांना लागू केले आहे. तरी या योजनेचा लाभ घेत असलेल्या सर्व शेतकऱ्यांना ही केवायसी करणे गरजेचे आहे .केवायसी न केल्यास यापुढे या योजनेचा लाभ केवायसी न करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार नाही.( pm kisan e-kyc procedure)(Pm kisan yojana 11th installment)
पीएम किसान सन्मान योजना म्हणजे शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ.
महाराष्ट्रातील अल्पभूधारक (marginal farmer)शेतकरी होरपळून जाऊ नये. केंद्र शासनाने शेतकऱ्यांचे उत्पादन दुपटीने वाढले जावे असा निर्धार केला आहे . पण हा निर्धार करीत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गावखेड्यातील तडागळ्यातील शेतकऱ्यांची स्थिती जाणून घेतली होती. त्यामुळेच जर शेतकऱ्यांचे उत्पादन आपल्याला वाढवायची असेल तर, अल्पभूधारक शेतकऱ्यांची स्थिती सुधारायला हवी अल्पभूधारक शेतकरी हाच देशाचा कणा आहे. देशात 80 टक्के अल्पभूधारक शेतकरी आहेत त्यांची प्रगती झाली तरच देशाची प्रगती होईल ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षात आली. त्यामुळेच शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी या उद्देशाने ही योजना केंद्र शासनाने सुरू केली आहे असे कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितले. (Marginal farmer increase income)(all about pm kisan sanaman nidhi)
शेतकरी मित्रांनो ,तुम्ही तुमच्या खात्याचे स्टेटस खालील प्रकारे दिलेल्या माहितीनुसार पाहू शकता.
1) पी एम किसान चा अधिकृत वेबसाईटवर चा
2) वेबसाईट खाली देण्यात आलेली आहे इथे क्लिक करून तुम्ही वेबसाईटवर जाऊ शकता.
https://pmkisan.gov.in
3) त्यानंतर फोन पेजच्या उजव्या बाजूला खाली फार्मर्स कॉर्नर farmers cornerअसा ऑप्शन येईल.
4) farmers corner मधे beneficiaries list या ऑप्शन वर जा.
5) त्यानंतर आपले राज्य, जिल्हा, उपजिल्हा आणि ब्लॉग निवडा
6) त्यानंतर लाभार्थ्यांची पूर्ण यादी समोर येईल .
त्या मध्ये आपले नाव पाहू शकता.(How to know pm kisan status) (pm kisan eligible farmer list)
पी एम किसान योजनेचे पैसे कोणत्या शेतकऱ्याला मिळतात ?
(Which farmer is eligible for pm kisan yojana)
या योजनेअंतर्गत दोन हेक्टरपेक्षा कमी शेती असलेल्या लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना वर्षभरात सहा हजार रुपये थेट खात्यामध्ये मिळतात. हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये अशा 3 किस्ती मध्ये वर्ग केले जातात. या योजनेच्या साठी शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची धावपळ करण्याची आवश्यकता पडत नाही हीच या योजनेची खासियत आहे.
शेतकऱ्यांनी करावे या नियमांचे पालन :
pmkisan:महाराष्ट्रातील 1 कोटी 5 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे .तर या मध्ये कोणते शेतकरी समाविष्ट आहे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडतोच केंद्र सरकारच्या वतीने ही योजना राबवली जात असून देशभरातील 11 कोटी हुन अधिक शेतकऱ्यांना याचा लाभ होत आहे. त्या अनुषंगाने दोन हजार कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली असल्याचे कृषी आयुक्त धीरजकुमार यांनी सांगितले आहे. ओमीक्रनच्या वाढत्या संक्रमणाचा धोका लक्षात घेता शेतकऱ्यांनी बँकांमध्ये गर्दी करू नये. तसेच करोना च्या नियमांचे काटेकोर पालन करावे असे आवाहनही करण्यात आले आहे. (Pm kisan yojana :pradhan mantri kisan sanamman nidhi yojana)