PM Kisan | खुशखबर! या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पैसे; यादीत तुमचे नाव आहे का? असं करा चेक
गेल्या वर्षी 25 डिसेंबर 2020 रोजी शेतकऱ्यांना पैसे हस्तांतरित केले
आतापर्यंत केंद्राने भारतातील 11.37 कोटी शेतकऱ्यांना 1.58 लाख कोटी रुपये हस्तांतरित केलेत. केंद्र सरकार 15 डिसेंबर 2021 पर्यंत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा (PM KISAN योजना) 10 वा हप्ता जारी करण्याचा विचार करत आहे.
सरकारने गेल्या वर्षी 25 डिसेंबर 2020 रोजी शेतकऱ्यांना पैसे हस्तांतरित केले होते.
हे पण वाचा –
- VJNT Loan scheme 2023 – या योजनेअंतर्गत तरुणांना व्यवसायासाठी बिनव्याजी कर्ज
- PM Kisan FPO Yojana | मोदी सरकारकडून मिळणार 15 लाखांपर्यंत कर्ज, योजनेबाबत जाणून घेण्यासाठी वाचा…
- Find Land Record: मोबाइलवर शेत-जमिनीचा ऑनलाईन नकाशा व आठ अ, 7/12 सातबारा पहा फक्त 2 मिनिटात
- Land Record 2023: शेत-जमिनीचा नकाशा ऑनलाईन व नवीन 7/12 सातबारा ऑनलाईन पहा फक्त 2 मिनिटात Online Nakasha
- जमीन खरेदी करण्यासाठी 100 टक्के अनुदान, कोणते शेतकरी असतील यासाठी पात्र? land record
यादी कशी पाहावी?
१) सर्वप्रथम ‘PM Kisan’ या अधिकृत वेबसाईट https://www.pmkisan.gov.in/ वर लॉग ऑन करा.
२) आता होमपेजवर ‘Farmers Corner’ वर तुम्हाला ‘Beneficiary List’ हे ऑप्शन दिसेल.
३) ‘Beneficiary List’ वर क्लिक करा.
४) आता आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल.
५) यातील ड्रॉपडाऊन लिस्टमधून तुमच्या राज्य निवडा.
६) आता ड्रॉपडाऊन यादीतून जिल्हा, उपजिल्हा, आणि गाव सिलेक्ट करा.
७) आता ‘Get Report’ वर क्लिक करा.
आता तुमच्या गावातील सर्व लाभार्थ्यांची यादी तुमच्या समोर दिसेल. यातून तुम्ही PM Kisan Beneficiary List मधील नाव पहावे लागेल. ही संपूर्ण लिस्ट Alphabetical Order प्रमाणे असते. एका पेजवर बर्याच लोकांची नावे असतात. तर लाभार्थ्यांची यादी बर्याच पेजवर असते.
जर आपले नाव या यादीमध्ये समाविष्ट केले असेल तर याचा अर्थ असा की, तुम्हाला PM Kisan Yojana चा लाभ मिळेल. जर आपले नाव या यादीमध्ये नसेल तर आपण आपल्या अर्जाची स्थिती तपासून पाहावी. यासाठी तुम्हाला ‘Farmers Corner’ मधील ‘Status of Self Registered/ CSC Farmers’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल. आता Aadhaar No नंतर कॅप्चा कोड टाकून सर्च बटणावर क्लिक करा. जर स्टेटस पेंडिंग दिसत असेल तर तुम्ही PM Kisan Helpline No वर संपर्क करा. तर दुसरीकडे तुमच्या माहितीमध्ये काही चुकी झाल्यास तिही दुरुस्त करु शकतात.
भरलेली चुकीची माहिती कशी कराल दुरुस्त
१)सर्व प्रथम ‘Farmers Corner’ वर जा.
२) आता ‘Aadhaar No’ आणि कॅप्चा कोड टाका आणि सर्च बटणावर क्लिक करा.
३) त्यानंतर ‘PM Kisan Application Form’ आपल्यासमोर दिसेल,
४) या फॉर्ममध्ये आपण आधार कार्डशी संबंधित तपशीलाशिवाय जवळपास प्रत्येक रखाण्यातील माहिती दुरुस्त करु शकतात.
हि माहिती आवडल्यास इतरांना नक्की शेयर करा.